शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Thane: हिंदुत्ववादी संघटनांचा ठाणे बंद, बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजपने दिला पाठिंबा, ठाणेकरांचे हाल

By अजित मांडके | Updated: December 17, 2022 15:17 IST

Thane: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच संतांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरु द्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून शनिवारी ठाणे  बंद पुकारण्यात आला होता.

- अजित मांडके

ठाणे - महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच संतांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरु द्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून शनिवारी ठाणे  बंद पुकारण्यात आला होता. या बंदमुळे ठाण्यातील मुख्यबाजारपेठसह, शहरातील इतर भागातील दुकाने व इतर सेवा बंद होत्या. तर काही ठिकाणच्या शाळांनी विद्याथ्र्याचे हाल होऊ नयेत म्हणून शाळाही बंद ठेवल्या होत्या. सकाळ सत्रत स्टेशन परिसरात रिक्षा व इतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद होती. तर वारक:यांनी अंधारे यांच्या विरोधात निषेध रॅली काढली होती. या रॅलीला बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने पाठींबा दिल्याचे दिसून आले. दुपारी १ वाजेर्पयत बंदची हवा दिसून आली. त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे दिसून आले.

सुषमा अंधारे व त्यांना पाठीशी घालणा:या नेत्यांच्या विरोधात शनिवारी ठाणे मधील हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे बंदची हाक दिली होती. यावेळी दुपारी १२ च्या सुमारास मुख्य बाजारपेठेत असलेल्या विठ्ठल मंदिराजवळून वारक:यांनी लॉंग मार्च काढला होता. यावेळी हरिनामाचा गजर करीत, हाती टाळ चिपळ्या घेऊन हा निषेध व्यक्त करण्यात आला. या लॉंग मार्चमध्ये बाळासाहेबांची शिवसेना व भाजपने देखील सहभाग घेतला होता. यावेळी, सुषमा अंधारे यांनी केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असून त्याला आम्ही पाठींबा दिल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.

दुसरीकडे बंदचे पडसाद सकाळ पासूनच शहरात दिसून आले. मुख्य बाजेरपेठेसह शहरातील इतर भागातील विविध आस्थापना बंद होत्या. तर या बंदमध्ये दुकानदार व इतर आस्थापांनीनी उत्सुर्फतपणो सहभाग घेतला असल्याचा दावा आंदोलनकत्र्यानी केला. सकाळच्या सत्रत रिक्षा व इतर सार्वजनिक वाहतुकही बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. स्टेशन परिसरातून जाणा:या रिक्षा देखील थांबविण्यात आल्या होत्या.

प्रवाशांना बसमधून उतरवलेठाणे बंदची हाक दिली असतांना एलबीएस मार्गावरुन येणा:या बेस्टच्या बस रहेजा तिनहात नाका भागात शिंदे गटाच्या पदाधिका:यांनी अडविल्याचे चित्र दिसून आले. तसेच प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. तसेच रिक्षा देखीब बंद करण्यात आल्या.

काही शाळा राहिल्या बंदठाणो बंदचा फटका विद्याथ्र्याना बसू नये यासाठी शहरातील काही खाजगी शाळांनी स्वत:हून शनिवारी सुट्टी जाहीर केली. त्यामुळे विद्याथ्र्याचे हाल वाचल्याचे दिसून आले. परंतु काही शाळांमध्ये शनिवारी विद्याथ्र्याचा शेवटचा पेपर होता. परंतु सुट्टी जाहीर झाल्याने हा पेपर आता सोमवारी घेतला जाणार आहे.

दिव्यातही बंददिव्यातही दिवा भाजपकडून बंद पाळण्यात आला. या बंदला दिव्यातील जनतेने प्रतिसाद दिला. दिवा भाजप व हिंदू संघटना यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्या प्रतिमात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

दुपारी १ नंतर सर्व व्यवहार सुरळीतहिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठाणे बंदची हवा ही दुपारी १ वाजेर्पयत दिसून आली. १२ वाजता निषेध रॅली काढण्यात आली. ती १ च्या सुमारास विसर्जीत झाल्यानंतर टप्याटप्याने शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे दिसून आले. मुख्य बाजारपेठसह इतर भागातील आस्थापना देखील सुरु झाल्याचे दिसून आले.

राजकीय पुढा-यांचा भरणाहिंदुत्ववादी संघटना तसेच वारक:यांनी काढलेल्या निषेध रॅलीत वारकरी कमी आणि राजकीय पुढा:यांचाच भरणा अधिक दिसून आला. भाजपच्या मंडळींच्या हातात तर निषेधाचे फलक होते, त्यावर भाजपचे कमळ फुलल्याचे दिसत होते. तर प्रत्येक राजकीय पुढाक:याच्या डोक्यावर वारक:यांची टोपी दिसून येत होती.

श्राध्द घालत केले पिंडदानयावेळी लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महिला आघाडीने व इतर पदाधिका:यांनी जांभळी नाका येथे सुषमा अंधारे यांच्या विचारांचे श्रध्द घालत पिंडदान केले.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा