शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: भाजी देण्यासाठी घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर प्रेयसीच्या मदतीने वृद्धाचा लैंगिक अत्याचार​​​​​​​, आराेपीस अटक, प्रेयसी फरार

By जितेंद्र कालेकर | Updated: August 2, 2024 17:29 IST

Thane Crime News: एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २५ वर्षीय प्रेयसीच्या मदतीने ६० वर्षीय आराेपी गाेपीनाथ गवळी या वृद्धाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेबराेबर बलात्कार करतानाचा प्रकारही मोबाइलमध्ये चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ तयार केला.

- जितेंद्र कालेकर ठाणे -  एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २५ वर्षीय प्रेयसीच्या मदतीने ६० वर्षीय आराेपी गाेपीनाथ गवळी या वृद्धाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेबराेबर बलात्कार करतानाचा प्रकारही मोबाइलमध्ये चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ तयार केला. हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या दोन्ही आरोपींकडून पिडितेला दिली जात हाेती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गवळी याला अटक केल्याची माहिती भिवंडीच्या शांतीनगर पाेलिसांनी शुक्रवारी दिली. त्याला या घृणास्पद कृत्यामध्ये मदत करणारी त्याची प्रेयसी मात्र पसार झाली असून तिचा शोध घेण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

भिवंडीतील एका भाजी विक्रेत्या महिलेची ही १६ वषीर्य पिडित मुलगी आहे. कहर म्हणजे आरोपी गोपीनाथ हा पीडितेचा नातेवाईक असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख होती. गाेपीनाथचे एका २५ वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध आहे. तिचे याआधी दाेन विवाह झाले आहेत. पतीपासून ती विभक्त राहते. जून २०२४ मध्ये पीडित मुलगी यातील आराेपी महिलेच्या घरी भाजी देण्यासाठी गेली होती. त्यावेळी आधीपासूनच गाेपीनाथ हा तिच्या घरात हाेता. मुलगी एकटीच घरात आल्याचा गैरफायदा घेत त्याच्या प्रेयसीने पीडित मुलीच्या अंगावरील कपडे काढले. तर गाेपीनाथ याने पीडित मुलीवर बलात्कार केला.

या घटनेमुळे पीडित मुलगी भयभीत झाल्याने तिने बदनामीच्या भीतीने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर ही मुलगी भयभीत असल्याचे पाहून तिला २ जून आणि ५ जून रोजी दोघा आरोपींनी रिक्षातून रामनगर भागातील आरोपी महिलेच्या खोलीवर नेले. तिच्यावर गोपीनाथने पुन्हा बलात्कार केला. खळबळजनक बाब म्हणजे दोन्ही वेळी बलात्कार करताना त्याच्याशी अनैतिक संबंध असलेल्या महिलेने मोबाईल कॅमेऱ्यात या प्रकाराचे चित्रीकरण केले होते. पुन्हा हेच व्हिडिओ चित्रण व्हायरल करण्याची धमकी देऊन यसाची कुठे वाच्यता केल्यास ठार मारून हे व्हिडिओ व्हायरल करु, अशी धमकीही या दाेन्ही आराेपींनी पीडितेला दिली हाेती.

दरम्यान, पीडित मुलगी या घटनेमुळे घाबरून राहत असल्याचे तिच्या मामीच्या लक्षात आले. तिने विश्वासात घेत तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ३० जुलै २०२४ रोजी पिडितेला घेऊन तिच्या मामीने शांतीनगर पोलित ठाण्यात तिच्यासोबत गुदरलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानुसार याप्रकरणी बलात्कारासह पोक्सो तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन आरोपी गोपीनाथला काही तासांतच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. त्याला मद्दत करणारी आरोपी महिला फरार असून तिचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीला ३१ जुलै राेजी न्यायालयात हजर केले असता, त्याला ३ ऑगस्टपर्यत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळthaneठाणे