शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १९ ऐवजी ६७ झाडे तोडली; लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीच्या रहिवाशांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:01 IST

आर्किटेक्ट म्हणतो २६ झाडे छाटली

n  लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीच्या मागील प्लॉटवरील १९ झाडे तोडण्यास परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात ६७ झाडे तोडली असल्याने त्याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी या सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे. गुरुवारी येथील रहिवाशांनी आयुक्तांना निवेदन दिले व वृक्षतोड करताना ५० वर्षे जुने झाड तोडल्याचा आरोप केला.मनपाने एका खासगी शाळेसाठी लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीमागील प्लॉट विकण्याआधी तेथे हिरवीगार झाडी होती. ज्या शहरात मोकळ्या जागेची तीव्र कमतरता आहे, अशा शहरात आपण वृक्षतोड करण्यास परवानग्या देता कशा, याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. आज, हा प्लॉट झाडे तोडल्याने मोकळा झाला आहे, असे रहिवाशांनी निवेदनात म्हटले आहे.  वृक्षतोड होत असल्याचे लक्षात आले तेव्हा रहिवासी मंजुषा पवार यांनी पालिकेला झाडे तोडण्यास विरोध केला. मात्र मनपाने दिलेल्या परवानगीचे पत्र त्यांनी वाचले. त्यात परवानगी दिली त्यापेक्षा अधिक झाडे तोडली आहेत, असे त्यांच्या लक्षात आले.  संबंधित अधिकाऱ्यांना ही झाडे तोडू नका, अशा वारंवार विनवण्या केल्या, पण त्यांनी माझे ऐकले नाही. तसेच, या झाडांचे पुनर्रोपण कुठे केले जाणार यासंदर्भात स्पष्टता नसल्याचे पवार म्हणाल्या. मनपाच्या परवानगीनुसार, १९ झाडे तोडायची व ४९ झाडांचे पुनर्रोपण करावे लागेल, पण छाटलेले वृक्ष व असलेले वृक्ष यांचा मेळ जुळत नाही. प्लॉटवरील ९१ झाडांपैकी सध्या फक्त २४ झाडे उरली आहेत. म्हणजे ६७ वृक्ष छाटले. मात्र आर्किटेक्ट आपण २६ झाडे तोडल्याचे सांगत आहे. म्हणजे परवानगी दिलेल्या १९ झाडांपेक्षा जास्त झाडे कापली आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.त्या प्लॉटवर वृक्षतोड नियमानुसार केली जात आहे. आज त्यांनी लेखी कळविले असल्याने वृक्षतोडीचे काम थांबविले आहे. लक्ष्मी नारायण सोसायटीच्या रहिवाशांच्या शंकांचे निरसन झाल्यावरच पुढील कामास सुरुवात केली जाईल.    - अलका खैरे,        वृक्ष प्राधिकरण अधिकारी, ठामपा