शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ४,७०५ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 02:54 IST

९५ इमारती अतिधोकादायक : धोकादायक इमारतींची संख्या एक हजारांनी वाढली

ठाणे : ठाणे महापालिकेने अतिधोकादायक, धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. त्यानुसार, मागील वर्षी अतिधोकादायक ६९ इमारतींपैकी ५४ इमारती रिकाम्या करूनही यावर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या ही ९५ च्या घरात गेली आहे. सिंधी कॉलनी, म्हाडा कॉलनी आणि कामगार वसाहतीमधील धोकादायक इमारतींमुळे ही संख्या वाढल्याचे अतिक्रमण विभागाचे म्हणणे आहे. दुसरीकडे धोकादायक इमारतींच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी एक हजारांनी वाढ झाली आहे. शहरात सध्या चार हजार ७०५ इमारती धोकादायक असून, त्यात नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात इमारती रिकाम्या करून त्यातील काही तोडल्याही होत्या. त्यामुळे यावर्षी त्यांची संख्या काही अंशी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती संख्या वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी सिंधी कॉलनी, म्हाडा कॉलनी तसेच कामगार वसाहतीमधील इमारतींचा समावेश धोकादायकच्या यादीत केला आहे. प्रभाग समितीनिहाय केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात चार हजार ७०५ धोकादायक इमारती आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या तीन हजार ६९३ इतकी होती. त्यामुळे यावर्षी ही संख्या एक हजारांनी वाढली आहे. सी-१ आणि सी-२ ए श्रेणीमधील इमारती या अतिधोकादायक असल्याने त्या तत्काळ रिकाम्या करणे आवश्यक आहे. सी-२ ए इमारतींची संख्या यावर्षी ११४ असून गेल्यावर्षी ती ९१ इतकी होती. गेल्या वर्षी ५४ इमारती रिकाम्या करूनही यावर्षी ही संख्या ९५ वर गेली आहे. यावर्षी सी-२ बी श्रेणीमधील इमारतींची संख्या ही २२६० इतकी असून सी-३ श्रेणीमधील इमारतींची संख्या २२३६ इतकी झाली आहे.नौपाड्यात सर्वाधिक अतिधोकादायक इमारतीजुने ठाणे अशी ओळख असलेल्या नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक अतिधोकादायक इमारतींची संख्या आहे. कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती एकत्रित केली असली, तरी कोपरीमध्ये अशा इमारतींची संख्या फार कमी आहे. त्यामुळे या सर्व इमारती नौपाड्यामधील आहेत. गेल्या वर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या ५३ होती. ती यावर्षी ६१ वर गेली आहे. नऊ मीटरपेक्षा रु ंद रस्ते नसल्याने या सर्व इमारतींचा पुनर्विकासदेखील रखडला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीमधील अतिधोकादायक इमारतींच्या संख्येत वाढ झाली आहे.धोकादायक इमारतींच्या श्रेणीसी १ - या श्रेणीमधील इमारती या अतिधोकादायक असून या इमारती रिकाम्या करून निष्कासित केल्या जातात.सी २ - या श्रेणीतील इमारती या रिकाम्या करून दुरु स्त करता येतात.सी २ बी - या श्रेणीमधील इमारतींमध्ये रहिवासी राहत असले तरी त्या दुरु स्त करता येऊ शकतात.सी ३ - या श्रेणीमधील इमारती या किरकोळ दुरु स्तीच्या असल्याने अशा इमारतींवर कारवाई केली जात नाही. मात्र, दुरु स्त करण्याच्या सूचना दिल्या जातात.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना