ठाण्यात ४,३०३ इमारती धोकादायक, ७७ इमारती अतिधोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 12:38 AM2020-06-25T00:38:00+5:302020-06-25T00:38:05+5:30

१ हजार ८३० इमारतींची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

In Thane, 4,303 buildings are dangerous, 77 buildings are extremely dangerous | ठाण्यात ४,३०३ इमारती धोकादायक, ७७ इमारती अतिधोकादायक

ठाण्यात ४,३०३ इमारती धोकादायक, ७७ इमारती अतिधोकादायक

Next

ठाणे : कोरोनाशी संबंधित कामात प्रशासन व्यस्त असताना, शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात ७७ अतिधोकादायक इमारतींसह ४२२६ धोकादायक इमारती आहेत. यापैकी १ हजार ८३० इमारतींची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होण्याचे प्रकार काही वर्षांपासून घडत आहेत. त्यामुÞळे प्रशासनाकडून दरवर्षी सर्वेक्षण करुन अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. त्यापैकी सी-१ मधील म्हणजेच अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात येतात. सी-१ ए मधील म्हणजेच धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांचे संरचनात्मक परिक्षण करण्यात येते.
यंदा केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ७७ अतिधोकादायक तर ४२२६ धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी सी-१ मध्ये ७७, सी-२ ए मध्ये ११३, सी-२ बी मध्ये २२८३ आणि सी-३ मध्ये १८३० इमारती आहेत. मध्यवर्ती भागातील नौपाडा - कोपरी प्रभाग समितीत ३७ अतिधोकादायक , वागळे इस्टेटमध्ये १ हजार ८१ तर मुंब्य्रात १ हजार ४१६ इमारती या धोकादायक स्थितीत आहेत.

Web Title: In Thane, 4,303 buildings are dangerous, 77 buildings are extremely dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.