शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दंडाची पावती मिळताच ३११ तळीरामांची उतरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:25 IST

पोलिसांच्या १७ युनिटच्या पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण शहरातील ८० ठिकाणी तपासणी नाके उभारून तळीरामांविरुद्ध श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी मोहीम राबविल्याची माहिती पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात थर्टी फर्स्टच्या रात्री व तत्पूर्वी दोन दिवसांत दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला. 

वाहतूक पोलिसांनी केलेल्या तपासणी मोहिमेत गेल्या दोन दिवसांत ३११ तळीराम वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह’ मोहिमेंतर्गत कारवाई केल्याची माहिती ठाण्याचे सह पाेलिस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी बुधवारी दिली. कारवाईत २७९ दुचाकीस्वार, १२ ट्रक, ११ कार आणि नऊ रिक्षाचालकांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांच्या १७ युनिटच्या पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण शहरातील ८० ठिकाणी तपासणी नाके उभारून तळीरामांविरुद्ध श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी मोहीम राबविल्याची माहिती पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. या तपासणी मोहिमेत वाहतूक शाखेचे २२ अधिकारी आणि ११० पोलिस कर्मचाऱ्यांसह वॉर्डन पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कल्याण-डोंबिवलीत ७३ मद्यपींवर कारवाई झाली. त्यामध्ये आठ जण हे वाहनचालकाशेजारी दारू पिऊन बसलेले होते. नारपोली येथे सर्वाधिक २७ चालकांवर कारवाई करण्यात आली. 

रायगडमध्ये ७ लाख ९१ हजारांची दारू जप्तअलिबाग : नववर्ष स्वागत करताना अवैध पद्धतीने दारू विक्री करणाऱ्या, बाळगणाऱ्यांविरोधात जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. १२ प्रकरणांत १३ जणांना अटक केली असून दोन वाहने जप्त केली. यात ७ लाख ९१ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा उत्पादन शुल्क विभागाची सात पथके जिल्ह्यात तैनात ठेवण्यात आली होती. ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पथकाची गस्त ठेवण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी रविकिरण कोले यांनी दिली आहे.

१०५ जणांवर पालघरमध्ये कारवाईनवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघर जिल्ह्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट, ढाबे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होणार असल्याने ठिकठिकाणी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये डंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या १०५ मद्यपींविरोधात गुन्हे दाखल केले.  तर अन्य रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९२ जणांवर कारवाई करून सव्वा लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

नवी मुंबईत ४३४ मद्यपी चालकांवर कारवाई...थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी राबवणाऱ्या विशेष मोहिमेंतर्गत रात्रभर कारवाया करण्यात आल्या. यात ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या ४३४ चालकांची झिंग उतरवण्यात आली. त्याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन, ५ ऑर्केस्ट्रा व ७ सर्व्हिस बार, ६ हुका पार्लर या आस्थापनांवर कारवाया केल्या आहेत, तसेच उघडघ्यावर मद्यपान, नशा करणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेNew Yearनववर्ष