शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाण्यात पुन्हा ३० मीटर बॉक्स जळून खाक; ७५ वर्षीय आजींसह अडकलेले रहिवासी सुखरूप 

By अजित मांडके | Updated: November 16, 2023 16:30 IST

Thane News: एकाच दिवशी दिवा आणि उपवन येथे मीटर रूम मधील मीटर बॉक्स जळून खाक झाल्याची घटना ताजी असताना, गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड वाघबीळ येथील गार्डन कोर्ट सोसायटीच्या "ए" विंग या इमारतीच्या तळ मजल्यावरती असणाऱ्या मीटर बॉक्स रुममध्ये लागलेल्या आगीत तब्बल ३० मीटर बॉक्स जळून खाक झाली आहेत.

- अजित मांडके  ठाणे -  एकाच दिवशी दिवा आणि उपवन येथे मीटर रूम मधील मीटर बॉक्स जळून खाक झाल्याची घटना ताजी असताना, गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड वाघबीळ येथील गार्डन कोर्ट सोसायटीच्या "ए" विंग या इमारतीच्या तळ मजल्यावरती असणाऱ्या मीटर बॉक्स रुममध्ये लागलेल्या आगीत तब्बल ३० मीटर बॉक्स जळून खाक झाली आहेत. यावेळी झालेल्या मोठ्या धूरामुळे सहाव्या मजल्यावर अडकलेल्या ७५ वर्षीय यमुनाबाई टोकरे या आजीबाईंसह काही नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. 

गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील तळ अधिक सात मजली इमारतीत आग लागली असून धूर मोठया प्रमाणात झाला आहे अशी माहिती जिज्ञा वाडेकर यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेत फोन करून दिली. तातडीने घटनास्थळी महावितरण , आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. घटनास्थळीमीटर बॉक्स रूममध्ये आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने त्या इमारतीमध्ये काही रहिवाशी अडकले होते. त्या रहिवाशांची अग्निशमन दलाचे जवानी यांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच यमुनाबाई टोकरे या आजीबाई इमारतीच्या सहाव्या मजल्यावरती धुरामध्ये अडकल्या होत्या. त्यांनाही अग्निशमन दलाचे जवानांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तसेच त्या आगीवर काही मिनिटात नियंत्रण मिळविण्यात यश आले असून या आगीमध्ये मीटर बॉक्स रूम मधील एकूण-३० मीटर बॉक्स व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :fireआगthaneठाणे