शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Thane: आपला दवाखान्याच्या २२ जागा झाल्या निश्चित, ६८ ठिकाणी उभारले जाणार, राज्य शासनाचा उपक्रम

By अजित मांडके | Updated: October 16, 2023 16:05 IST

Thane News: ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात यापूर्वीच आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार ४५ च्या आसपास आपला दवाखाना सुरु आहेत. त्यात मागील काही महिन्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून एका ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे.

- अजित मांडके ठाणे - ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात यापूर्वीच आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार ४५ च्या आसपास आपला दवाखाना सुरु आहेत. त्यात मागील काही महिन्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून एका ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. त्यात आता ६७ दवाखान्यांची भर पडणार आहे. त्यातील २२ ठिकाणच्या जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ठाण्यातील झोपडपट्टी भागातील नागरीकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाण्यातही आपला दवाखाना महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. त्यानुसार शहरातील ४५ ठिकाणी सध्या आपला दवाखाना सुरु आहे. याची वेळ सांयकाळी ५ ते रात्री १० एवढी आहे. परंतु त्याचा लाभ गोरगरीब नागरीकांना मिळत आहे. अगदी येऊर पासून ते थेट दिव्या पर्यंत हे जाळे निर्माण करण्यात आले आहे. याठिकाणी रुग्णांना मोफत औषधोपचार, ईसीजी, रक्त तपासणी, औषधे आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आता आपला दवाखाना ही संकल्पना सुरु केली आहे. त्यानुसार ठाण्यातही काही महिन्यांपूर्वी रामनगर भागात आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. दुपारी दोन ते रात्री १० वाजेपर्यंत हा दवाखाना सुरु असतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार आता शहरातील सर्वच भागात असे दवाखाने सुरु करण्यासाठी जागांचा शोध महापालिकेकडून घेतला जात आहे. त्यात २२ जागा निश्चित झाल्या आहेत. उर्वरीत ४६ जागांचा शोधही सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

या आहेत २२ जागाखिडकाळी, दातीवली, साबेगाव, सैनिक नगर, अमिनाबाद, एमटीएमएल कंपाऊंड, संजय नगर, रामनगर, हाजुरी, गांधी नगर, येऊर, बामनोई पाडा, कळवा, मानपाडा, सावरकरनगर, वागळे इस्टेट, ढोकाळी, दिवा आदी ठिकाणे निश्चित झाली आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलthaneठाणेGovernmentसरकार