शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीवर विधानभवनात चर्चा : केडीएमसी सहकार्य करत नसल्याची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 11:31 IST

ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला असून गावठाण हद्दीतील चिंचोळया रस्त्यांमुळे समस्या गंभीर झाली आहे. त्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह मध्य रेल्वे प्रशासन कानाडोळा करत असल्याची टिका स्थानिक लोकप्रतिनिधींसह रहिवाश्यांनी केली. त्यासंदर्भात विधानभवनात गुरुवारी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विधानपरिषद सदस्य माणिकराव ठाकरेंच्या दालनात बैठक झाली.

ठळक मुद्दे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विधानपरिषद सदस्य माणिकराव ठाकरेंच्या दालनात बैठकमध्य रेल्वे प्रशासनाची बघ्याची भूमिका

डोंबिवली: ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला असून गावठाण हद्दीतील चिंचोळया रस्त्यांमुळे समस्या गंभीर झाली आहे. त्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह मध्य रेल्वे प्रशासन कानाडोळा करत असल्याची टिका स्थानिक लोकप्रतिनिधींसह रहिवाश्यांनी केली. त्यासंदर्भात विधानभवनात गुरुवारी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विधानपरिषद सदस्य माणिकराव ठाकरेंच्या दालनात बैठक झाली.त्या बैठकीत ठाकुर्लीतील चोळेगाव येथिल कोंडीसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. ठाकरेंचे स्विय सचिव सुशिल शेलार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यास केडीएमसीचे आयुक्त पी.वेलारसू, ठाण्याचे वाहतूक विभाग पोलिस उपायुक्त अमित काळे, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबासाहेब आव्हाड, डोंबिवलीचे वाहतूक नियंत्रण पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे, मध्य रेल्वेचे सह पोलिस आयुक्त दिपक शर्मा , माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विनायक पाटील, धनंजत चाळके आदी उपस्थित होते. ठाकुर्लील गावदेवी परिसरातील रस्ता चिंचोळा असल्याने तेथे अवघा १५ फूट रस्ता आहे. दोन्ही दिशांची दोन वाहने एकाच वेळी जावू शकत नसल्याची वस्तूस्थिती गंभीरे यांनी मांडली. त्यावर आगामी काळात लवकरच ठाकुर्ली उड्डाणपूल तयार होणार असून त्यामुळे ठाकुर्लीच्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघेल असा विश्वास आयुक्त वेलारसू यांनी व्यक्त केला. तसेच महिला समितीनजीकच्या पर्यायी रस्त्यांबाबत सातत्याने केडीएमसी प्रशासन, रेल्वे यांना पत्रव्यवहार केला आहे, परंतू तो पर्याय स्विकारणे, त्याची अंमलबजावणी करण्याकडे दोन्ही प्रशासनाला वेळ नाही, ईच्छाशक्ती नाही अशी नाराजी श्रीकर चौधरी यांनी व्यक्त केली. सातत्याने पत्रव्यवहार तरी किती करायचा, त्यावर कोणतेही उत्तर येत नाही ही स्मार्ट सिटीची स्थिती असल्याची टिका त्यांनी केली. त्यावर रेल्वेचे अधिकारी शर्मा यांनी तातडीने रेल्वे पोलिस दलाच्या ठाकुर्लीतील अधिका-यांसमवेत चर्चा करुन काही पर्याय निघतो का? हे बघितले जाईल असे आश्वासन दिले. तसेच स्मार्टसिटी अंतर्गत अनेक योजना असून त्यात ठाकुर्लीतील गावठाणांचे रस्ते रुंद करणे, कोंडी सोडवणे यासह एकंदरीतच शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर देण्यात येत असल्याचे वेलारसू यांनी स्पष्ट केले. त्यास काही अवधी लागेल, पण उपाययोजना निश्चित होतील. उड्डाणपूलाचे काम वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असून त्यासाठी सातत्याने केडीएमसीचे अधिकारी, रेल्वे प्रशासन यांच्यात चर्चा सुरु असून पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्टीकरणही वेलारसू यांनी दिले. झपाट्याने नागरिकरण होत असून प्रत्येकाकडे वाहन असल्याने विशिष्ठ वेळांना ती वाहने रस्त्यावर येतात. त्यात अरुंद रस्ते असल्याने समस्या जटील झाल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.चाळकेंनी वाहतूक कोंडीमुळे प्रदुषणात वाढ होते, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. तसेच वाहनांचा अपघात झाल्यास त्यात महिला, विद्यार्थी जखमी होतात. वर्षानूवर्षे रस्ते रुंद करणे, ठाकुर्ली रेल्वे गेट या समस्या जैसे थे असून काहीही हालचाल होत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये महापालिकेसंदर्भात तीव्र नाराजी, असंतोष असल्याचे स्पष्ट केले.माणिकराव ठाकरे यांनी महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांबाबत वाहतूक विभागाने काय कारवाई केली आहे, पुढे काय कार्यवाही होणार?, तसेच चोळेगाव परिसरातील हनुमान मंदिरानजीक सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करता येते का? असे विविध उपाय सुचवले. त्यानूसार कोंडी सुटते का याकडे लक्ष द्यावे असेही वाहतूक विभाग, महापालिका यांना सूचित केले. 

टॅग्स :thakurliठाकुर्लीdombivaliडोंबिवली