शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीचा ‘तो’ पूल होणार इतिहासजमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 01:19 IST

ठाकुर्ली रेल्वेस्थानकातील मुंबई दिशेकडील जुना अरुंद पादचारी पूल लवकरच इतिहासजमा होणार आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : ठाकुर्ली रेल्वेस्थानकातील मुंबई दिशेकडील जुना अरुंद पादचारी पूल लवकरच इतिहासजमा होणार आहे. जुन्या पुलापासून काही अंतरावरच नवा पूल बांधण्याचे काम मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) हाती घेतले आहे. त्याकरता फलाट क्रमांक १ आणि २ च्या मध्ये पत्रे ठोकल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून चिंचोळ्या जागेतून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.ठाकुर्ली स्थानकातील हा पादचारी पूल १९८० च्या दशकातील आहे. प्रवाशांच्या वाढत्या लोंढ्यापुढे तो तोकडा पडत आहे. पुलाखालून गाड्या जाताना त्याला हादरे देखिल बसत आहेत. भविष्यात कोणताही अपघात होऊ नये, यासाठी पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने नवा पूल बांधण्याचे आवश्यकता आहे. त्यासाठीचे काम सुरू झाल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.नवीन पुलाच्या कामासाठी फलाट क्रमांक १ आणि २ मध्ये पत्रे लावल्याने लोकल आल्यावर प्रवाशांना तेथून वाट काढणे अडचणीचे ठरत आहे. लोकल आल्यावर जुन्या पुलाच्या दिशेने ये-जा करणाऱ्यांना खोळंबून रहावे लागत आहे. महिलांचे डबे तेथे येत असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास त्यांना होत आहे. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, नवीन पूल नेमका किती लांबी, रुंदीचा असेल, याची माहिती रेल्वे अधिकाºयांकडून मिळाली नाही.>वारंवार पाठपुरावाठाकुर्ली स्थानकाचे विस्तारीकरण झाल्यानंतरही मुंबई दिशेकडील पुलाची डागडुजी झालेली नव्हती. शिवाय रेल्वे फाटक बंद केल्याने प्रवाशांना त्या अरुंद पुलावरून ये-जा करणे त्रासाचे होत होते.नवा पूल व्हावा, पुलाच्या जिन्यांची रुंदी वाढावी, आदी मागण्या भाजपाच्या नगरसेविका प्रमिला चौधरी, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी तसेच प्रवासी संघटना, मनसे, शिवसेनेच्या रेल्वे समितीने केल्या होत्या. खा. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता.