शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीच्या नागरिकांना पादचारी पूलावर जाण्यासाठी अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 20:18 IST

रेल्वे पादचारी पूलांवरील फेरिवाल्यांमुळे अडथळे होत असतांनाच डोंबिवली ठाकुर्ली रस्त्यावर असलेल्या पादचारी पूलावर जाण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपुलाचे सामान अस्ताव्यस्त असल्याने नागरिक पाठ फिरवत आहेत.

डोंबिवली: रेल्वे पादचारी पूलांवरील फेरिवाल्यांमुळे अडथळे होत असतांनाच डोंबिवली ठाकुर्ली रस्त्यावर असलेल्या पादचारी पूलावर जाण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपुलाचे सामान अस्ताव्यस्त असल्याने नागरिक पाठ फिरवत आहेत. त्यामुळे या पूलाकडे दुर्लक्ष होत असून सोय असूनही त्याचा फारसा वापर होत नाही. केडीएमसीने याकडे लक्ष द्यावे, अडथळे हटवावेत आणि नागरिकांसाठी सोय करुन द्यावी अशी मागणी होत आहे.पूर्वेकडे ठाकुर्लीत जाण्यासाठी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी आदी ठिकाणी जाण्यासाठी तर पश्चिमेला बावनचाळ, गणेशनगर, डी बिल्डिींग यासह राजू नगर आदी ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना या पूलाचा वापर करता येतो. मात्र काही महिन्यांपासून या ठिकाणी ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम सुरु आहे, त्यासाठी लागणारे गर्डर, सळया यासंह अन्य सामान त्या पूलाच्या पाय-यांनजीक टाकण्यात आले आहे. त्यामुळे तेथे जातांना नागरिकांना अपघाताची शक्यता आहे. परिणामी नागरिक तेथून जाणे टाळतात. बहुतांशी नागरिक रेल्वे फाटकामधून पूर्व-पश्चिम जातात. तर काही गणेशमंदिरालगतच्या पादचारी पूलाचा वापर करतात. नागरिकांनी या पूलाचा वापर वाढवावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत ते होणे आवश्यक आहे. त्याकडे परिसरातील नागरिकांनी लक्ष वेधले. अन्यथा या ठिकाणीही गैरव्यवहार सुरु होतील. अनेकदा युवक वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी येत असल्याचे सांगण्यात आले.पूलाचा वापर अधिकाधीक करण्यासाठी त्यासमोरील अडथळे हटवावेत, आणि परिसराची स्वच्छता राखावी अशी मागणी स्थानिक करीत आहेत. उड्डाणपूल झाल्यावर या पूलाचा वापर सर्वाधिक होणार असून त्याच्या डागडुजीकडेही वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. गणेश मंदिर नजीकच्या पादचारी पूलाची डागडुजी सुरु झाली आहे, त्यातच या ठिकाणीही आवश्यकता असेल ते काम करण्यात यावे असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली