शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सौरऊर्जेवरील रिक्षेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:42 IST

ठाणे महापालिकेने सौरऊर्जेवर धावणा-या रिक्षाला प्राधान्य दिले असून महिला बालकल्याण तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने सौरऊर्जेवर धावणा-या रिक्षाला प्राधान्य दिले असून महिला बालकल्याण तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पर्यावरणातील घातक वायू कमी करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले. सोमवारी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी या उपक्र माचा शुभारंभ केला.पर्यावरणसंवर्धनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने विविध प्रकारचे उपक्र म राबवण्यात येत आहे. सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा हा देखील या उपक्र माचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठीच ही सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर घेतली आहे. संपूर्ण सौरऊर्जेवर चालणाºया या रिक्षामध्ये चार प्रकारच्या बॅटºया आहेत. संपूर्ण आठ तास बॅटरी चार्ज केल्यानंतर ४८ तासांनी ऊर्जा तयार होते. रिक्षा संपूर्ण चार्ज केल्यानंतर कमीतकमी १०० किमीचे अंतर कापता येते. कोणत्याही प्रकारचे इंधन यामध्ये नसल्याने यावर कोणत्या प्रकारचा करदेखील लागणार नाही. केवळ एकदा रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या रिक्षाची किंमत एक लाख ८० हजारांपर्यंत असून महिला बालकल्याणच्या माध्यमातून तसेच इतर योजनांच्या माध्यमातून ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, अशा सर्व नागरिकांसाठी रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.यापूर्वी महापालिकेच्या योजनांमधून नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलच्या रिक्षा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. मात्र, आता पुढचे पाऊल म्हणून पर्यावरणाचे संवर्धन करणे, हा या उपक्र मामागचा मुख्य उद्देश असल्याने व्यवसायासाठी अशा प्रकारच्या रिक्षा घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.लोकप्रतिनिधींनीदेखील या उपक्र माचे स्वागत केले असून अशा प्रकारचा उपक्र म पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी सांगितले. ठाण्यामध्ये हा उपक्र म यशस्वी करण्यासाठी पालिका प्रशासन तर प्रयत्न करेलच, मात्र हा उपक्र म अधिक यशस्वी करण्यासाठी नागरिकांनादेखील पुढाकार घ्यायला हवा, असे पाटील यांनी सांगितले.>सौरऊर्जेवर चालणाºया या रिक्षेत चार प्रकारच्या बॅटºया आहेत. ती बॅटरी चार्ज होण्यास किमान आठ तास लागतात. पण एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर रिक्षा कमीतकमी १०० किमीचे अंतर कापते. ही रिक्षा पेट्रोल, डिझेलच्या रिक्षेपेक्षा स्वस्त पडते. एव्हढेच नव्हे, तर सीएनजीच्या रिक्षेपेक्षाही स्वस्त पडते. त्यामुळे साध्या रिक्षेच्या तुलनेत हिचे भाडे खूप कमी आहे. तसेच ती पर्र्यावरणपूरक आहे.