शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सुरू असलेल्या अ. भा. मराठी व्यंगचित्रकार संमेलनात लहान मुलांची रंगली व्यंगचित्र कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 12:37 IST

रविवारी सकाळी लहान मुलांची व्यंगचित्र कार्यशाळा कचराळी तलाव येथे आयोजित करण्यात आली होती. उत्साहाने, आनंदाने ही मुले या कार्यशाळेत सहभागी झाली होती. सोबत त्यांचे पालकही उपस्थित होते.

ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांची व्यंगचित्र कार्यशाळा विविध वयोगटातील विद्यार्थी सहभागीगणेश जोशी, वैजनाथ दुलंगे, विवेक प्रभुकेळुस्कर, विवेक मेहेत्रे, नागराज गरड यांनी केले मार्गदर्शन

ठाणे : ठाण्यात सुरू असलेल्या कार्टूनिस्ट कंबाईन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनात रविवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांची व्यंगचित्र कार्यशाळा पार पडली. यात विविध वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते.     ज्ञानराज सभागृह आणि कचराळी तलाव येथे संमेलना अंतर्गत कार्यक्रम आयोजित केले आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रथमच महिलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात महिला व्यंगचित्रकार राधा गावडे आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांनी मार्गदर्शन केले तर दुसºया बाजूला लहान मुलांची व्यंगचित्र कार्यशाळा पार पडली. यात अमोल ठाकूर व गौैरव यादव यांनी प्रात्यक्षिके दाखविली. संमेलनाच्या दुसºया दिवसाची सुरूवातच शालेय विद्यार्थ्यांच्या व्यंगचित्र कार्यशाळेने झाली. यात मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. वही आणि स्केचपेन हे आयोजकांकडून पुरविण्यात आले होते. पाचपाखाडी येथील कचराळी तलाव येथे ही कार्यशाळा पार पडली. यात गणेश जोशी, वैजनाथ दुलंगे, विवेक प्रभुकेळुस्कर, विवेक मेहेत्रे, नागराज गरड यांनी मार्गदर्शन केले. पक्षी प्राणी, हसरे - रडके चेहरे, १५ दिवसाच्या बाळापासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचे चेहरे, इमारती अशा अनेक गोष्टी मुलांना व्यंगचित्राच्या माध्यमातून शिकविण्यात आल्या. हसत खेळत, गमती जमतीत मुलांचा रविवारच्या सकाळी व्यंगचित्राचा तास रंगला होता. कार्यशाळा आवडल्याचे मुले आवर्जुन आपल्या पालकांना सांगत होते. आज दुपारी १.३० वाजता सर्व वयोगटातील व्यंगचित्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर आमच्यासारखे आम्हीच स्पर्धा, अध्यक्षीय भाषण, जीवनगौरव पुरस्कार, परिसंवाद असे भरगच्च कार्यक्रम होणार आहे. सायं. ७ वा. मनसे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे हे या संमेलनात उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकentertainmentकरमणूक