शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

लाकडी नांगराकडे शेतकऱ्यांनी फिरविली आहे पाठ ?

By admin | Updated: June 23, 2017 05:07 IST

पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात डोळयांसमोर उभी राहते ती हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज

लोकमत न्यूज नेटवर्ककासा: पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात डोळयांसमोर उभी राहते ती हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज, पण सोबतच नांगर ओढणारी, चिखल तुडविणारी बैलांची जोडी, पण आजच्या आधुनिक युगात मात्र ही बैलांची नांगरणी थांबली असून त्याऐवजी शेतकरी पॉवर टिलर वापराकडे वळतांना दिसत आहेत. खेडयापाडयातील शेतकरी म्हटला म्हणजे त्यांच्याकडे डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक दोन जोडया, बैलगाडी ही असणारच असा समज एकदा जून महिना उजाडला कि शेतकरी जमिन मशागतीसाठी नांगर दुरूस्ती करणे, नविन नांगर तयार करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नविन बैल खरेदी करणे किंवा भाडयाने आणणे. नांगरासाठी व चिखलणीसाठी लागणाऱ्या फाळासाठी मजबूत लाकूड शोधणे नांगरास दुसर शोधणे अशा कामांची शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. नांगर मजबूत टिकावू असावा यासाठी शेतकरी साग, शिसव, खैर या सारख्या वनस्पतींच्या लाकडांचा वापर करतात.मात्र आता ग्रामीण भागातील शेतकरी मशागतीच्या कामसाठी पॉवर टिलर वापरू लागला आहे. लाकडी नागंराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकऱ्यांना वेळ, पैसा तसचे शरीरीक श्रमदेखील वाचतात. त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीत कमी वेळात जास्त जमीन नांगरली जाते. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी आदी कामासाठी एकमेकांच्या शेतात जावून मदत करत असत. परंतु आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमित पणामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे रोपणी, पेरणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतात. तसेच पॉवर टिलर भाडयाने घेण्यास शेतकऱ्याला साधारणपणे ४०० रू. प्रती तास पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर वापरत आहेत. पॉवर टिलरच्या पावरामुळे बैलगाडया आणि लाकडी नांगराच्या तुलनेत शेतकऱ्यांना आता जास्त खर्च होतो. परंतु कामे वेळेत होतात. असे शेतकरी महेंद्र पावडे म्हणतात. सध्या बाजारात एका बैलजोडीची किंमत ३० ते ५० हजारवर पोहचली आहे. तसेच भाडे तत्वावर बैलजोडयाही मिळत नाहीत. त्याचप्रमाणे वर्षभर बैलांची राखण करणे. त्यांना खाद्य पुरविणे आदी बाबी शेतकऱ्यांना कराव्या लागतात. त्यामानाने उन्हाळयात गवत, पावसाळी वाहतूक, शेतातील धान्य वाहतूकीसाठी बैलगाडीची भाडेतत्वावर होणारी मागणीही आता खूपच कमी झाली आहे. तसेच पॉवर टिलर व ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना व बचत गटांना ३५ ते ५० टक्के अनुदान शासनाच्या कृषी विभागाकडून दिले जाते. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामांसाठी लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलकउे वळतांना दिसत आहेत.