शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

केडीएमसीच्या १८ गावांतील नगरसेवकांवर मुदतीपूर्वीच गंडांतर? गावे वगळल्याने होणार कृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:22 IST

केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

- प्रशांत मानेकल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाच आता या गावांतील १३ नगरसेवकांचे पदही मुदतीपूर्वीच बाद होणार आहे. जुलै २००२ ची पुनरावृत्ती होणार असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जात असताना नगरसेवकपद रद्द करण्याच्या प्रक्रियेला केडीएमसीमधील निवडणूक विभागानेही सुरुवात केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, संबंधित विभागाने सध्या तरी याबाबत चुप्पी साधली आहे.केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर, केडीएमसीत राहिलेल्या नऊ गावांसह महापालिकेच्या बदललेल्या हद्दीसह अधिसूचनाही सरकारने नुकतीच जाहीर केली आहे. निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आधीच दिले आहेत. त्यामुळे केडीएमसीच्या निवडणूक विभागाने कामकाजाला सुरुवात केली आहे. महापालिकेतील नगरसेवकांचे सदस्यत्व ११ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. परंतु, कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबरनंतर काही महिने प्रशासकीय राजवट लागू होण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.दरम्यान, १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन होणार असल्याने या गावांमधील नगरसेवकांचे पद ११ नोव्हेंबरच्या मुदतीपूर्वीच बाद होणार आहे. १२ जुलै २००२ ला २७ गावे केडीएमसीतून वगळण्यात आली होती. त्यावेळी एमआयडीसीतील आजदे गावचे महसूल क्षेत्र पूर्णपणे महापालिकेतून वगळण्यात आले होते. तेव्हा प्रभाग क्रमांक ६६ चे एमआयडीसीचे तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांचे नगरसेवकपद बाद झाले होते.महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात म्हात्रे यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु, त्यांना दिलासा मिळाला नाही. हीच प्रक्रिया आता पुन्हा राबविली जाणार असल्याने १८ गावांतील नगरसेवकांचे पदही आता बाद होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत भाष्य करण्यास महापालिकेच्या निवडणूक विभागाने नकार दिला आहे.या गावांमधील नगरसेवक होणार बादघेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळिवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांमधील लोकप्रतिनिधींचे नगरसेवकपद मुदतीपूर्वीच बाद होणार आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका