शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावरील विजयोत्सव पाहून आनंदित झाले पेशव्यांचे दहावे वंशज 

By धीरज परब | Updated: March 7, 2023 19:20 IST

पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्ल्यावर महापालिकेने साजरा केलेला विजयोत्सवचा कार्यक्रम, नरवीर चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा व किल्ल्याचा परिसर पाहून पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले पेशव्यांचे दहावे वंशज पुष्करसिंह पेशवा आनंदित झाले . यावेळी त्यांनी पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला . 

वसईच्या किल्ल्यावर नजर ठेवण्यासह त्यांची समुद्र मार्गे येणारी रसद तोडणे  व पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसई किल्ला जिंकण्यासाठी खाडी पलीकडे भाईंदरच्या चौक डोंगरावरील धारावी किल्ला हाती येणे आवश्यक होते . धारावी किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांनी ८ वेळा प्रयत्न केला होता . नवव्या वेळी म्हणजेच ६ मार्च १७३९ रोजी धारावी किल्ला नरवीर चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चारून मराठा साम्राज्यात आणला होता . ६ मार्च हा विजय दिन म्हणून साजरा करण्याचा आग्रह गडप्रेमीं कडून होत होता . यंदा त्याला २८४ वर्ष झाली. 

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी हा विजय दिन महापालिके मार्फत साजरा करण्याचा निर्णय घेतला . त्या अनुषंगाने पालिकेने संपूर्ण किल्ल्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट केली होती.  पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते धारावी देवी मंदिरात आरती व दर्शनाने कार्यक्रमाची सुरवात केली गेली . चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली . यावेळी  पेशव्यांसह आयुक्त दिलीप ढोले , आमदार गीता जैन , शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती व वडील प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत आदी उपस्थित होते . 

महापालिकेच्या काशी , माशाचा पाडा , मुर्धे , मोरवा व भाईंदर पश्चिम ह्या ५ शाळां मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात चिमाजी अप्पा स्मारक पासून किल्ल्याच्या बुरुज पर्यंत मिरवणूक काढली . विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालात हि फेरी काढली . यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . पुष्करसिंह यांनी सांगितले कि , आपण कोकणात अनेक ठिकाणी फिरलो मात्र इकडे कधी आलो नाही याचे मला आश्चर्य वाटते. चिमाजी अप्पा यांच्या  स्मृतींचे इतके सुंदर जतन करत आला आहेत त्याचा आनंद वाटतो . त्यांनी पेशव्यांचा श्लोक म्हणून दाखवत तो श्रीवर्धनच्या लक्ष्मी नारायण मंदिर मागे लिहून ठेवला आहे व चिमाजी अप्पा त्याच मातीतले होते असे सांगितले . 

धारावी किल्ल्याच्या संवर्धन आणि जतन साठी राज्य शासनाने १० कोटी तर महापालिकेने ३ कोटींची तरतूद केली आहे . महापालिकेने चिमाजी अप्पा यांचे स्मारक व उद्यान विकसित केले आहे . किल्ला परिसरचे ऐतिहासिक पावित्र्य जपत त्याचे महत्व नागरिकांना होण्यासाठी पालिका विविध उपक्रम व कामे करत असल्याचे आयुक्त ढोले यांनी सांगितले . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक