शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बकऱ्यावरून मीरा रोडमध्ये तणाव; कुटुंबास धक्काबुक्की काशिमीरा ठाण्यात ५२ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 08:43 IST

Mira Road: मीरा रोडच्या जे. पी. नॉर्थ या गृहसंकुलात बकरी ईदनिमित्त बकरा आणण्यावरून रहिवाशांनी एका विशिष्ट धर्माच्या कुटुंबास  धक्काबुक्की केल्याचा आरोप त्या कुटुंबाने केला.

मीरा रोड : मीरा रोडच्या जे. पी. नॉर्थ या गृहसंकुलात बकरी ईदनिमित्त बकरा आणण्यावरून रहिवाशांनी एका विशिष्ट धर्माच्या कुटुंबास  धक्काबुक्की केल्याचा आरोप त्या कुटुंबाने केला.  बुधवारी पहाटेपर्यंत संकुलाच्या आवारात धार्मिक घोषणा देत रहिवाशांनी बकऱ्याला ठेवण्यास विरोध केला. काशिमीरा पोलिस ठाण्यात ५२ रहिवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

महामार्गालगत वेस्टर्न हॉटेलजवळ जे. पी. नॉर्थ हे मोठे गृहसंकुल आहे. सदर संकुलातील एस्टेला इमारतीत मोहसीन खान, त्यांची पत्नी व चार वर्षांचा मुलगा राहतात.  गुरुवारी बकरी ईद असल्याने मंगळवारी रात्री खरेदी करून इमारतीत परतले असता रहिवाशांच्या जमावाने त्यांची गाडी अडवून गाडीत कुर्बानीसाठी बकरा आणलाय का म्हणून जबरदस्तीने तपासणी केली, असा त्यांचा आरोप आहे. तसेच घरात ठेवलेला बकरा काढून टाका,  सोसायटीच्या परवानगीशिवाय बकरा कसा काय आणला, असे धमकावल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यातून दोन्ही बाजूने  बोलाचाली होऊन वाद वाढला. 

विनयभंग, दंगलीचे गुन्हे मोहसीन यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून बुधवारी पहाटे ओळख पटलेले काळ्या टी-शर्टमधील इसम, उदयचंद्र कामत, आशिष त्रिपाठी, लाल सिंग, चंद्रा सेन, अमित तिवारी, धर्मेंद्र सिंग, राम लखन सिंग, आनंद पटवारी, श्रीमंत शेखर  तसेच अन्य  ३० ते ४० जण अशा ५२ लोकांवर विनयभंग, दंगल आदी गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल केल्याबद्दल संताप व्यक्त करत लोक पोलिसठाण्यावर गेले.

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी