शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनसाठी निविदा प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:29 IST

टाटा, एल अ‍ॅण्ड टीसह सात कंपन्या इच्छुक : पहिल्या टप्प्यात २३७ किमी मार्गाची उभारणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई-अहमदाबाद या भारतातील पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) यांनी नवी दिल्लीत बुधवारी तांत्रिक निविदा खुल्या केल्या. या स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत तीन निविदाकर्त्यांनी सहभाग घेतला, ज्यात सात मोठ्या बांधकाम कंपन्यांचा समावेश आहे.

यात अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, जेएमसी प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड यांनी संयुक्तपणे, एल अ‍ॅण्ड टी लिमिटेड यांनी स्वतंत्रपणे, तर एनसीसी लिमिटेड-टाटा प्रोजेक्ट लिमिटेड-जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला आहे.

मुंबई-अहमदाबाद या ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन मार्गादरम्यान १२ स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. एकूण मार्गापैकी २३७ किमी लांबीचा मार्ग आणि चार स्थानके यांच्या उभारणीसाठी एनएचएसआरसीएलने बुधवारी निविदा खुल्या केल्या. आतापर्यंतची ही सर्वात मोठी निविदा आहे.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान ९० हजार रोजगारांची निर्मिती होणार असून उत्पादन क्षेत्रालाही मोठे बळ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत ७५ लाख मेट्रिक टन सिमेंटचा वापर होणार आहे. बांधकामासाठी मोठ्या यंत्रांचीही गरज भासणार असल्याचे बुलेट ट्रेनच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.या चार स्थानकांचा आहे समावेशच्वापी ते बडोदा या दरम्यानच्या २३७ किमी लांबीच्या मार्गात वापी, बिलिमोरा, सुरत आणि भरूच या चार स्थानकांच्या बांधकामासह नदीवरील २४ पूल, तर रस्त्यांवरील ३० पुलांचा समावेश आहे.च्बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमध्ये आतापर्यंत ८३ टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याने तेथील कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कामे सुरू करण्यास भूसंपादनाचा अडथळा निर्माण झाला आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन