शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या बारबालेचा खून करणाऱ्यास दहा महिन्यांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 19:43 IST

ठाणे : अनैतिक संबंधातून लग्नासाठी तगादा लावून कुटूंबाला संपवून टाकण्याची धमकी देणारी बारबाला फुतूली उर्फ फरीदाखातून उर्फ मिम (२५) ...

ठळक मुद्देठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने लावला छडा मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआरोपीला सापळा लावून घेतले ताब्यात

ठाणे: अनैतिक संबंधातून लग्नासाठी तगादा लावून कुटूंबाला संपवून टाकण्याची धमकी देणारी बारबाला फुतूली उर्फ फरीदाखातून उर्फ मिम (२५) हिचा दहा महिन्यांपूर्वी खून करणा-या मजिद मंडल याला मुंब्रा येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.एका बारबालेचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना १ मे २०१८ रोजी डोंबिवलीतील गोलवली, उपाध्याय चाळीत घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी मानपाडा पोलिसांप्रमाणे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाकडूनही तपास करण्यात येत होता.फुतूलीच्या खूनानंतर मारेकरी घराला बाहेरून कुलूप लावून पळून गेला होता. चाळ मालक राजकुमार उपाध्याय याच्या तक्र ारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. या खूनाबाबत कोणताही पुरावा नसल्यामुळे पोलिसासमोर तपासाचे मोठे आव्हान होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असतांना सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद जगदेव, उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि दिनेश शेलार आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खून झालेल्या या बारबालेचा मोबाईल क्रमांक मिळविला. तिच्या फोनचे लोकेशन कोलकता येथे मिळाले. त्यानुसार एका पथकाने कोलकाता येथे जाऊन तपास केला. हा मोबाइल राज मंडल (रा. लष्करपूर, कोलकाता) या व्यक्तीकडे आढळला. पोलिसांनी हा मोबाईल हस्तगत केला. तेंव्हा या महिलेसाबत माजीदुल मंडल नामक व्यक्ती वास्तव्याला होती. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते, अशीही माहिती पोलिसांना मिळाली. माजीदुल याचा काहीच शोध लागला नाही. दरम्यान, माजीदुल हा २८ मार्च २०१९ रोजी पहाटे ४.३० वा. च्या सुमारास ठाण्याच्या मुंब्रा येथील कौसा कब्रस्थान येथे येणार असल्याची माहिती होनराव यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने कौसा येथे सापळा लावून माजीदुल यास अटक केली. तो विवाहित होता. तरीही फुजुली हिच्याशी त्याचे अनैतिक संबंध हाते. यातूनच त्याच्या पत्नीशी तिचा वादही झाला होता. त्याने तिला एका बारमध्ये वेटर म्हणून नोकरीला लावले होते. त्याची पत्नी आणि मुलगी ही गावी असतांना फुतुली हिने त्याला लग्नाचा तगादा लावला. जर लग्न केले नाही तर तुझ्या कुटूंबाला संपवून टाकेल, अशी धमकीही तिने त्याला दिली होती. याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने २८ एप्रिल २०१८ रोजी ओढणीने गळा आवळून तिचा खून केल्याची कबूली त्याने दिल्याचे देवराज यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून