शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पैशाचे अमिषाने महिलांना शरीरविक्रयास लावणाऱ्या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:24 IST

गरिब, गरजू महिलांना पैशांच्या अमिषाने शरिर विक्रयास लावणा-या रेणुका शिंदे या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई तीन महिलांची केली सुटकावागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे: पैशांचे अमिष दाखवून महिलांना शरीर विक्रयास भाग पाडणा-या रेणुका शिंदे (३५) या महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री मॉडेला चेक नाका येथील गोपाळआश्रम बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट येथून अटक केली. तिच्या ताब्यातून तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घोडबंदर रोडवरील ओवाळा नाका येथे राहणारी रेणुका ही महिला काही गरीब आणि गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून नोकरी लावण्याच्या नावाखाली शरीर विक्र याचा व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास दौंडकर यांच्यासह उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, जमादार राजू महाले, हवालदार विजय बडगुजर, विजय पवार, अंक्षिता मिसाळ, अक्षदा साळवी आणि निशा कारंडे आदींच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. बनावट गि-हाईक पाठवून या प्रकाराची खात्री करण्यात आली. त्यावेळी पाच हजारांमध्ये रेणुकाने एका महिलेचा सौदा केला. लोणावळयातील हॉटेलमध्ये तिला नेण्याचे ठरले. त्याचवेही हॉटेल गोपालआश्रम मध्ये या पथकाने रेणुकाला ताब्यात घेतले. साईराज आणि उदय या दोघांच्या मदतीने ती हा अनैतिक व्यवसाय करीत होती. पाच हजारांमधून एक पिडीत महिलेकडे दोन हजार रुपये सोपवून उर्वरित तीन हजार रुपये ती तिघांमध्ये वाटून घेत होती. तिच्याविरुद्ध पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. तिच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीProstitutionवेश्याव्यवसाय