शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रंगसंगतीमुळे अडलेले तेजस्विनी बसचे घोडे नव्या वर्षात धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 05:36 IST

ठाणे परिवहनसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, पुणे आणि मुंबईत महिलांसाठी खास अशा तेजस्विनी बस मागील वर्षी दाखल होणार होत्या.

ठाणे : ठाणे परिवहनसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, पुणे आणि मुंबईत महिलांसाठी खास अशा तेजस्विनी बस मागील वर्षी दाखल होणार होत्या. परंतु, अद्यापही त्यांचे घोंगडे भिजत पडले आहे. ठाणे आणि नवी मुंबईच्या ताफ्यात त्या नव्या वर्षात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु, कल्याण-डोंबिवली महापालिकेची निविदा प्रक्रियाच अद्याप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. इतर महापालिकांनी या बसची तयारी जोरात सुरू केली असली, तरी राज्य शासनाकडून रंगसंगती आणि त्या बसवर कोणते छायाचित्र असावे, यावरून मागील चार ते पाच महिने चर्चेचे गुºहाळ सुरू होते. आता दोन दिवसांपूर्वीच यावर तोडगा निघाल्याने तेजस्विनीचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा होणार आहे.महिलांना प्रवासासाठी स्वतंत्र बस उपलब्ध होऊन त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या हेतूने राज्य शासनाने तेजस्विनी बसयोजना सुरू करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना एकूण ३०० बस मिळणार आहेत. यापैकी ५० बस ठाणे शहराला मिळणार असूननवी मुंबईला १० आणि इतर महापालिका मिळून अशा ३०० बस दाखल होणार आहेत.>ठाण्यात सहा कोटी परिवहनकडे वर्गठाणे महापालिकेत या प्रस्तावास परिवहन समिती तसेच सर्वसाधारण सभेने काही महिन्यांपूर्वी मान्यता दिली आहे. त्यानंतर, त्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार, खरेदीसाठी परिवहन प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्या खरेदीसाठी आवश्यक असलेल्या १६ कोटींपैकी सहा कोटींचा निधी परिवहन प्रशासनाकडे वर्ग झाला आहे. या बस जीसीसी तत्त्वावर खाजगी ठेकेदारामार्फत चालवण्यात येणार असून त्यावर चालक, वाहक नेमण्याची, शिवाय बसची देखभाल करण्याची जबाबदारीदेखील संबंधित ठेकेदाराची असणार आहे. या ५० बसवर महिला वाहक असणार आहेत.>नवी मुंबई परिवहनसेवेत १० बस दाखल होणार आहेत. परंतु, राज्य शासनाकडून या बसची रंगसंगती कशी असावी, त्यावर छायाचित्र कोणते असावे, यासाठी त्या रस्त्यावर दाखल झाल्या नव्हत्या. आता काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाकडून त्याच्या गाइडलाइन्स आल्याने नव्या वर्षात त्या रस्त्यावर धावणार आहेत.- शिरीष आदरवाड,परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई.>कल्याण-डोंबिवलीला मात्र ठेकेदार मिळेना...कल्याण-डोंबिवली परिवहनसेवेमार्फत तेजस्विनी बससाठी निविदा काढण्यात आली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही तिला प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली. येथे चार बस दाखल होणार असून, एक कोटी २० लाखांचा निधीसुद्धा परिवहनसेवेला प्राप्त झालेला आहे.>ठाणे परिवहनसेवेकडून या ५० बसची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून यासंदर्भात राज्य शासनाकडून अहवालही पाठवला आहे. त्यानुसार, नवीन वर्षात या बस एकाच वेळेस राज्य शासनाने घालून दिलेल्या रंगसंगतीमध्ये आणि आकर्षक छायाचित्रासह दाखल होणार आहेत.- संदीप माळवी, परिवहन व्यवस्थापक, ठामपा.