शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाच्या उपोषणामुळे आदिवासींचे सरकारी घरकुले खर्डीत तहसिलदारांनी तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 20:34 IST

शासनाच्या निधीतून आदिवासी परिवाराना ही घरकुले बांधून देण्यात आली होती. सरकारी भूखंडावर ही घरकुले असल्याच्या कारणाखाली संबंधीत सरपंच उपोषणाला बसले, त्यांनी घरकुले तोडण्याची मागील लावून धरली, त्यांची मागणी ग्राह्य धरून आदिवासी परिवारांची घरकुले तोडण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाने तक्रारदार सदस्यांसह सभागृहाच्या निदर्शनात आणले. पण ‘सरपंच उपोषणाला बसले म्हणून आदिवासींना बेघर कसे करू शकले’ हा विषय मात्र जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये जोरदार चर्चीला जात आहे.

ठळक मुद्देसरकारी खर्चाने बांधलेल्या या आदिवासीचे घरकुले तोडून सध्या त्यांना बेघर केल्यामुळे संताप ग्राम पंचायत या घरांची घरपट्टी देखील रहिवाश्यांकडून वसूलशासनाच्या निधीतून आदिवासी परिवाराना ही घरकुले बांधून देण्यात आली होती.

ठाणे : मूलभूत हक्कापैकी आदिवासींच्या निवाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाने घरकूल मंजूर करून ते बांधून दिले. मात्र सरपंचाने उपोषण सुरू करून ते घरकुले पाडण्याची मागणी केली. त्यास न्याय देण्यासाठी खर्डी येथील आदिवासींचे घरकुले तोडण्याची कारवायी केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या जनरलबॉडीच्या सभेतही झाली. त्याविरोधात कारवायी करण्याचे संकेत आहे.शासनाच्या निधीतून आदिवासी परिवाराना ही घरकुले बांधून देण्यात आली होती. सरकारी भूखंडावर ही घरकुले असल्याच्या कारणाखाली संबंधीत सरपंच उपोषणाला बसले, त्यांनी घरकुले तोडण्याची मागील लावून धरली, त्यांची मागणी ग्राह्य धरून आदिवासी परिवारांची घरकुले तोडण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाने तक्रारदार सदस्यांसह सभागृहाच्या निदर्शनात आणले. पण ‘सरपंच उपोषणाला बसले म्हणून आदिवासींना बेघर कसे करू शकले’ हा विषय मात्र जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये जोरदार चर्चीला जात आहे. याशिवाय संबंधीत सदस्याने देखील आदिवासीना न्याय देण्यासाठी लावून धरला आहे.सरकारी जागेवर असलेल्या या घरकुलांसह संबंधीत तहसिलदारांनी सात अतिक्रमणे जमीनदोस्त केलेली आहेत. सरकारी खर्चाने बांधलेल्या या आदिवासीचे घरकुले तोडून सध्या त्यांना बेघर केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. सरकारी जागेवर जरी घरकुले बांधलेले असले तरी संबंधीत लाभार्थी आदिवासी त्याव जागेवर काही वर्षांपासून राहत आहेत. शासनाने त्यांना विद्युत पुरवठ्यासह, पाणी पुरवठा व अन्यही अत्यावश्यक सोयीसुविधा आधीच पुरवलेल्या आहेत. याशिवाय २००० सालापर्यंत असलेल्या झोपडपट्यामधील ही घरे अधिकृत झालेली होती. ग्राम पंचायत या घरांची घरपट्टी देखील रहिवाश्यांकडून वसूल करीत असल्याच्या मुद्यावर देखील जिल्हा परिषदेत चर्चा झाली.आदिवासींच्या या घरकुलांवर केलेली कारवायी अन्यायकारी आहे. यामुळे या बेघर अदिवासींना त्वरीत घरकुले देण्याची मागणी लावून धरली आहे. अन्यथा सरकारी निधीतून बांधण्यात आलेले आदिवासींचे घरकुले तोंडल्यामुळे संबंधीतावर गुन्हे दाखल करून कारवायी करण्याची मागणी सध्या जोरधरू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या देखील आदिवासी समाजातील असल्यामुळे न्याय मिळण्याची अपेक्षा संबंधीत सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली. यावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद