शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘टेक्निकल टास्क फोर्स’ कागदावरच, जाचक अटींमुळे वाजला बो-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:54 IST

कळवा-दिवादरम्यान जानेवारी २०१५मध्ये झालेल्या प्रवाशांच्या हिंसक आंदोलनानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई विभागीय टेक्निकल टास्क फोर्स अर्थात विशेष तांत्रिक कार्य पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती.

- नारायण जाधव ।ठाणे : कळवा-दिवादरम्यान जानेवारी २०१५मध्ये झालेल्या प्रवाशांच्या हिंसक आंदोलनानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई विभागीय टेक्निकल टास्क फोर्स अर्थात विशेष तांत्रिक कार्य पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु, रेल्वे बोर्डाने लादलेल्या जाचक अटींमुळे हे पथक अद्यापही कागदावरच आहे. परिणामी, मुंबई लोकल सेवेसह रेल्वेच्या पायाभूत आणि तांत्रिक समस्या सुटल्या नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. परळ-एल्फिन्स्टन दरम्यानच्या पादचारी पूल दुर्घटनेनंतर पुन्हा तांत्रिक कार्य पथक स्थापन करण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. मात्र जोवर रेल्वे बोर्डाच्या हटवादी नोकरशहांकडून जाचक अटींचा अडसर दूर केला जात नाही. तोपर्यंत हे पथक स्थापन होऊच शकत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.शुक्रवारच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २३ प्रवाशांना जीव गमवावा लागल्यानंतर पुन्हा तांत्रिक कार्य पथकाचा विषय उपस्थित झाला. जानेवारी २०१५मध्ये सुरेश प्रभू यांनी या पथकाच्या स्थापनेची घोषणा केली होती. डिसेंबर २०१६मध्ये रेल्वे मंत्रालयात जपानच्या रेल्वे टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि कोरियन रेल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अधिकाºयांसोबत झालेल्या बैठकीत भारतीय रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा झाली होती. या बैठकीत अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासमवेत प्रभू यांनी संवाद साधला होता. त्यानंतर केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील रेल्वेच्या सुरक्षेसाठी विशेष तांत्रिक पथक स्थापनेसंदर्भात रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला. परंतु, या पथकातील ४२०० बेसिक पगार असणारे तंत्रज्ञ हे कोणत्याही रेल्वे युनियनचे सदस्य असता कामा नयेत, अशी अट घातली गेली. तसेच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यात घेण्याची अट होती. याला इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशनने तीव्र विरोध करून फेबु्रवारी २०१७मध्ये तसे पत्र रेल्वेमंत्र्यांना धाडले होते. आमच्या असोसिएशनचे ५० हजारांहून अधिक सक्रिय तंत्रज्ञ असताना केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची मदत का घ्यायची, असा त्यांचा सवाल होता. या आणि अशा अनेक जाचक अटींमुळे तांत्रिक कार्य पथक कागदावरच राहिले....तरीही सेवा अविरत सुरूमुंबईची उपनगरीय लोकल ही केवळ मुंबई शहरापुरतीमर्यादित नसून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील नऊ महापालिका आणि सात नगरपालिका क्षेत्रांसह पालघर-डहाणूपासून कसाºयापर्यंतच्या प्रवाशांचा तिच्याशी थेट संबंध आहे. दररोज ७५ लाख प्रवासी लोकलने ये-जा करतात. शिवाय मध्य आणि पश्चिम मार्गावरील लांब पल्ल्याच्या अनेक प्रवासी गाड्यांसह मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. अपुºया पायाभूत सुविधा, तांत्रिक समस्यांना तोंड देऊन ही सेवा अविरत सुरू असते.

टॅग्स :Mumbaiमुंबईcentral railwayमध्ये रेल्वे