शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सीईटीपी केंद्राला करणार तांत्रिक मदत, इस्त्राईलच्या कंपनीकडून पाहणी, आधुनिकीकरणाच्या दिशेने पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:11 IST

डोंबिवली शहरातील एमआयडीसीतील फेज २ मधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (सीईटीपी) इस्त्राईलच्या कंपनीने नुकतीच पाहणी केली.

डोंबिवली: शहरातील एमआयडीसीतील फेज २ मधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (सीईटीपी) इस्त्राईलच्या कंपनीने नुकतीच पाहणी केली. कंपनीने केंद्रातील तपशीलवार माहिती घेतली आहे. कंपनीच्या सूचनेनुसार त्यांचे तांत्रिक सहाय्य घेऊन या केंद्राचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.इस्त्राईलमधील ओडीस फिल्टरिंग लिमिटेड कंपनीच्या विपणन संचालक सारी इली यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेट दिली. या वेळी कंपनीचे भारतातील युनिटचे विपणन प्रमुख शैलेश सावदी, रासायनिक सांडपाणी केंद्राचे संचालक देवेन सोनी, उदय वालावलकर, उद्योजक राजू बानगावकर आदी उपस्थित होते.रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी ओडीस कंपनीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला जाणार आहे. त्यासाठी कंपनीने केंद्राची पाहणी केली. या केंद्रातून प्रक्रिया करून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यात सीओडी व बीओडीची मात्रा निकषांपेक्षा कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे.डोंबिवलीत दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत. कापड उद्योग कंपन्यांतील सांडपाण्यावर फेज १ मधील १६ दश लक्ष लिटर क्षमतेच्या केंद्रात प्रक्रिया केली जाते. फेज २ मधील दोन दश लक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाºया पाण्यावर प्रक्रिया केली जाते. सांडपाणी केंद्रातून निकषांच्या आधारे प्रक्रिया केली जात नसल्याने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका न्यायप्रविष्ट आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने फेज २ मधील रासायनिक कारखान्यांना नोटीस बजावून हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. एक वर्षानंतर हे प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास लवादाने परवानगी दिली.तांत्रिक सहाय्याचा खर्च करणार कोण?फेज १ आणि २ या दोन्ही रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे आधुनिकीकरण अमेरिकी कंपनीमार्फत केले जाणार आहे. एमआयडीसी त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यातील ८२ कोटींचा खर्च फेज वनमधील तर, उर्वरित १८ कोटींचा खर्च फेज २ मधील सांडपाणी प्रक्रिया आधुनिकीकरणावर होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.कामासाठी इच्छा व्यक्त केली आहे : इस्त्राईल कंपनीकडून तांत्रिक सहाय्य घेण्याचा विषय एमआयडीसीकडे मांडला जाणार आहे. त्यामुळे हा विषय १०० कोटींच्या कामात समाविष्ट करायचा की, त्यासाठी कारखानदार स्वतंत्रपणे खर्च करतील, याबाबत निर्णय झालेला नाही, अशी माहिती फेज २च्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे संचालक सोनी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका