शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या खुनाची सुपारी देणा-या मुख्याध्यापकाला अटक, १० हजारांची सुपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:07 IST

आपल्याविरुद्ध शिक्षण विभागाकडे तक्रार करणा-या महाजन प्रजापती या शिक्षकावर खुनी हल्ला करणारा सावरकर नगरातील ज्ञानोदय हिंदी विद्यालयाचा मुख्याध्यापक रमेश मिश्रा आणि त्याचा मुलगा

ठाणे : आपल्याविरुद्ध शिक्षण विभागाकडे तक्रार करणा-या महाजन प्रजापती या शिक्षकावर खुनी हल्ला करणारा सावरकर नगरातील ज्ञानोदय हिंदी विद्यालयाचा मुख्याध्यापक रमेश मिश्रा आणि त्याचा मुलगा आशिष या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी रात्री अखेर अटक केली. त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. गेली अनेक दिवस तो पोलिसांना हुलकावणी देत होता.मिश्राने दहा हजारांची सुपारी देत प्रजापतींवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी रोशन सिंग (२०), विशाल मोरे (१९), प्रकाश चाळके (२०) आणि विक्रांत सोनवणे या चौघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, उपनिरीक्षक सचिन आंब्रे यांच्या पथकाने यापूर्वीच अटक केली होती. मिश्रा याने ३ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा हल्ला घडवून आणला होता. त्यावेळी प्रजापती यांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला केला होता. ज्ञानोदय विद्यालयात कनिष्ठ शिक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या प्रजापती यांनी मिश्राविरुद्ध शाळेतील गैरव्यवहाराबाबत शिक्षण विभागासह अन्य खात्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मिश्रा हे नऊ वर्षांपासून शाळेत एकही दिवस हजर न राहता केवळ मस्टरवर सह्या करून वेतन घेत असल्याची प्रजापती यांच्यासह अन्य शिक्षकांचीही तक्रार होती. ३ डिसेंबर रोजी रात्री प्रजापती जेवण झाल्यानंतर सावरकरनगरातील पानाच्या दुकानावर गेले होते. त्याचवेळी चौघांनी त्यांच्यावर तलवार आणि लोखंडी रॉडने खूनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी मिश्राही तिथे होते. शिक्षकावर खूनी हल्ला करणाºया रोशन सिंग याच्यासह चौघांना ९ ते १५ डिसेंबर दरम्यान पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मुख्याध्यापक मिश्रा मात्र पसार झाला होता. 

टॅग्स :Arrestअटक