शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या रखडल्या; दुरूस्तीसह नवीन अर्ज भरण्याची शिक्षकाना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:50 IST

ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि. श. कांबळे यांनी गुरूवारी या बदल्यांचा अद्यादेश जारी केला. त्यात ठाणेसह कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकाना या आधी आॅनलाइन भरलेल्या अर्जात दुरूस्ती किंवा अर्ज रद्द करून नवीन अर्ज भरण्याची संधी दिली आहे. यात नव्याने पात्र ठरणाऱ्या शिक्षकांना देखील आॅनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. प्राप्त होणाऱ्या  माहिती पत्रकात ठिकठिकाणच्या रिक्त जागांची माहिती शिक्षकांना त्वरीत देण्याची सक्ती देखील शिक्षकण विभागावर करण्यात आली आहे. यामुळे त्यांना पसंतीची शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देशिक्षकांना ५ डिसेंबरपासून आॅनलाइन फार्म भरता येईलया बदल्या ३१ मे २०१९पर्यंतच्या संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन केल्या जाणार पात्र ठरलेल्या शिक्षकांनी २०१७ -१८ करीता अर्ज दाखल केले

ठाणे : गजावाजा करून मागील वर्षी जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्यांसाठी आॅनलाइन पध्दतीने अर्ज भरून घेण्यात आले. मात्र त्यानुसार अजूनही बदल्या झाल्या नाही. रखडलेल्या या बदल्यांमधील अर्जात शिक्षकाना दुरूस्ती करण्याची संधी आहे. अन्यथा तो रद्द करून नवीन अर्ज भरता येईल. यावेळी पात्र ठरणाऱ्या नवीन शिक्षकाना देखील अर्ज करण्याची सक्ती करण्यात आली आहे. याबदल्यांसाठी ५ डिसेंबरपासून आॅनलाइन अर्ज भरावे लागणार आहे.ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि. श. कांबळे यांनी गुरूवारी या बदल्यांचा अद्यादेश जारी केला. त्यात ठाणेसह कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकाना या आधी आॅनलाइन भरलेल्या अर्जात दुरूस्ती किंवा अर्ज रद्द करून नवीन अर्ज भरण्याची संधी दिली आहे. यात नव्याने पात्र ठरणाऱ्या शिक्षकांना देखील आॅनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. प्राप्त होणाऱ्या  माहिती पत्रकात ठिकठिकाणच्या रिक्त जागांची माहिती शिक्षकांना त्वरीत देण्याची सक्ती देखील शिक्षकण विभागावर करण्यात आली आहे. यामुळे त्यांना पसंतीची शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे.शिक्षकांच्या आॅनलाइन पध्दतीने बदल्या करण्याचे धोरण राज्य शासनाने निश्चित केले आहे. यानुसार पात्र ठरलेल्या शिक्षकांनी २०१७ -१८ करीता अर्ज दाखल केले. मात्र त्या बदल्या अद्याप झाल्या नाही. यावेळी पात्र ठरलेल्या व अर्ज केलेल्या शिक्षकांसह नव्याने पात्र ठरणाऱ्या  शिक्षकांच्या बदल्या आता शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापूर्वी म्हणजे मे २०१९ या कालावधीत होणार आहेत. या बदल्या ३१ मे २०१९पर्यंतच्या संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन केल्या जाणार आहे. त्यासाठी आधी अर्ज भरलेल्या शिक्षकाना त्यांच्या पसंतीनुसार अर्जात बदल करता येईल किंवा तो रद्द करून नवीन अर्ज दाखल करावा लागणार आहे. याशिवाय नव्याने पात्र ठरलेल्या शिक्षकाना देखील आॅनलाइन अर्ज भरावे लागणार आहे. संबंधीत शिक्षकांना त्याची जाणीव करून दिली जाणार आहे.बदलीस पात्र असलेल्या व नव्याने पात्र ठरलेल्या शिक्षकाना आगामी शैक्षणिक वर्षात नवीन शाळेवर हजर होता यावे, या दृष्टीने संबंधीत शिक्षकांना ५ डिसेंबरपासून आॅनलाइन फार्म भरता येईल, याशिवाय जुन्या शिक्षकना फार्ममध्ये बदल करता येईल किंना तो रद्द करून नवीन फार्म भरता येणार आहे. याव्दारे २०१८ - १९ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांच्या या बदल्या होणार आहेत. या बदल्यांच्या दृष्टीने शिक्षकाना सर्व रिक्त पदांची माहिती दिली जाईल. याशिवाय बदलीस पात्र ठरणाऱ्या  शिक्षकांची यादी देखील संबंधीत उपलब्ध होईल. जेणे करून शिक्षकाना त्यांचे अर्ज रिक्त पदास अनुसरून भरता येणे शक्य आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकthaneठाणे