शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ठाण्याच्या टीडीआरएफच्या जवानांनी वाचविले बुडणाऱ्या दोघांचे प्राण

By जितेंद्र कालेकर | Updated: July 19, 2023 16:25 IST

उपवन भागात टीडीआरएफच्या जवानांना विकी आणि अजय हे दोघे उपवन तलावात बुडताना आढळले.

ठाणे: ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या (टीडीआरएफ) जवानांनी विकी माधव पुजारी (२६, रा. गांधीनगर, ठाणे) आणि अजय किसन वाल्मीकी (३०, रा. गांधीनगर, ठाणे ) या पाण्यात बुडणाºया दोघांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास समोर आली. टीडीआरएफच्या जवानांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

उपवन भागात टीडीआरएफच्या जवानांना विकी आणि अजय हे दोघे उपवन तलावात बुडताना आढळले. तात्काळ क्षणाचाही विलंब न करता जवान प्रशांत बोंबे, संदेश घोडे आणि प्रतीक पाटील या तिघांनीही पाण्यात उडया मारुन दोघांचेही प्राण वाचविले. त्यांना जवान चेतन तरोळे , संकेत पाटील ,अमोल दराडे आणि सतीश पाटील यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यांना वर्तकनगर पोलिस ठाण्याचे बिट मार्शल दरेकर आणि गावीत यांच्या ताब्यात देण्यात आले.

विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी याच उपवन तलावात पोहतांना दम लागल्यामुळे एका बारावीतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पाण्यात बुडणाºया दोघांना टीडीआरएफची तातडीने मदत मिळाल्यामुळे दोघांचेही प्राण वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस