शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

केडीएमसीच्या गळक्या कार्यालयाला ताडपत्रीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:47 IST

यात काही दस्तावेजही भिजले असून, येथील पसारा पाहता ही जागा एकप्रकारे कर्मचाºयांसाठी गैरसोयीची ठरत आहे.

डोंबिवली : केडीएमसीच्या डोंबिवलीतील विभागीय कार्यालयात ठिकठिकाणी पावसामुळे गळती सुरू झाली आहे. येथील तळ आणि पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहांमध्ये छतातून पाण्याची गळती होत असतानाच आता महत्त्वाचा विभाग असलेल्या जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयातही पाणी ठिबकत आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे येथील कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. यात काही दस्तावेजही भिजले असून, येथील पसारा पाहता ही जागा एकप्रकारे कर्मचाºयांसाठी गैरसोयीची ठरत आहे.केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय हे रेल्वेस्थानकानजीक अतिशय गजबजलेल्या ठिकाणी आहे. ही वास्तू ४२ वर्षे जुनी आहे. माजी आयुक्त गोविंद बोडके यांच्या कार्यकाळात आॅगस्ट २०१९ मध्ये विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलाहोता.महापालिकेच्या स्वनिधीतून हा विकास करणे अशक्य असल्याने खाजगीकरणातून हे काम केले जाणार होते. बोडके यांनी अंमलबजावणीचे आदेशही दिले होते. महापालिका प्रशासकीय कामकाजाची सोय व विभागीय कार्यालयाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी येथील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालये त्या-त्या प्रभाग क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.त्यानुसार, ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी.पी. चेंबर, तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय सुनीलनगर येथे हलवण्यात येणार आहे. पी.पी. चेंबरमधील पहिला आणि दुसरा मजला ‘फ’ प्रभागासाठी घेतला जाणार होता. परंतु, याबाबतची कोणतीही कृती अद्याप झालेली नाही. परिणामी, आजही कर्मचारी आणि अधिकारी अवकळा प्राप्त झालेल्या विभागीय कार्यालयात काम करीत आहेत.तळमजल्यावर ‘ग’ प्रभाग कार्यालय आहे. त्याच्याशेजारी असलेल्या आपत्कालीन विभागाच्या कार्यालयात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने तेथील कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ही समस्या अधूनमधून उद्भवत असताना आता पहिल्या मजल्यावरील जन्ममृत्यू नोंदणी विभागाच्या कार्यालयात पावसामुळे गळती सुरू झाली आहे. त्यामुळे कर्मचाºयांना गैरसोयीला सामोरे जावे लागतआहे.तसेच जन्म आणि मृत्यूच्या नोंदीसाठी या विभागात मोठ्या संख्येने येणाºया नागरिकांनाही पुरेशा जागेअभावी कार्यालयाच्या बाहेर रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे.गेल्या सात ते आठ दिवसांपासून गळती सुरू असल्याने ताडपत्रीचा आधार घेऊन कामकाज करण्याची नामुश्की येथील कर्मचाºयांवर ओढवली आहे. या कार्यालयातील भिंतींमधूनही पावसाचे पाणी झिरपत असल्याने येथील काही दस्तावेजही भिजले आहेत. प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.>दुर्घटना घडल्यानंतर जाग येणार का?के डीएमसीच्या डोंबिवलीतील या इमारतीमधील बहुतांश कार्यालयांमध्ये गळतीचा त्रास होत असून एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. या वास्तूच्या पुनर्विकासाकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या झालेल्या दुर्लक्षाबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.