शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पुर्वेत तांबट पक्ष्याला मिळालं जीवदान

By अजित मांडके | Updated: April 26, 2024 16:15 IST

मुंबईचा पक्षी अशी ओळख असणारा तांबट पक्षी वर्षभर आपल्या परिसरात असून देखील तो दिसत नाही. परंतु आताच्या पान गळती हंगाम असल्यामुळे त्याचे दर्शन घडत आहे

ठाणे : ठाणे शहरात तापमानाचा पारा वाढत असताना याची झळ पक्ष्यांना बसू लागली आहे. ठाणे पूर्व पोस्ट ऑफिस जवळ निपचित पडलेल्या एका तांबट पक्ष्याला महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी जीवदान दिले आहे. पक्ष्यांची योग्य सुश्रुषा करून त्याच्या अधिवासात सोडले आहे. 

मुंबईचा पक्षी अशी ओळख असणारा तांबट पक्षी वर्षभर आपल्या परिसरात असून देखील तो दिसत नाही. परंतु आताच्या पान गळती हंगाम असल्यामुळे त्याचे दर्शन घडत आहे. अशातच ठाणे पूर्व मीठ बंदर रोड पोस्ट ऑफिस जवळ, वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या तांबट पक्षी पडलेला आढळून आला. या पक्ष्यावर भूतदया दाखवत  पोस्टमन अक्षय वाळके यांनी सामाजिक कार्यकर्ते आनंद कोळी यांच्याशी संपर्क साधला. आनंद यांनी ही माहिती  महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांना सांगितले.  दरम्यान तांबट पक्ष्याला भरत यांनी पाणी पाजून तात्काळ सुश्रुषा केली. थोडा वेळात तांबट पक्ष्याला ताजतावन वाटल्यावर तांबट पक्ष्याला अधिवासात सोडले.

तांबट पक्ष्याचे तीन प्रकार असून  कॉपर स्मिथ बारबेट,  तपकिरी डोक्याचा तांबट (ब्राऊन हेडड बारबेट) आणि पांढ-या गालाचा तांबट (व्हाईट चिक बारबेट) असे  प्रकार आढळून येतात. यापैकी कॉपर स्मिथ बारबेट मुंबई ठाणे शहरात सर्वत्र आढळतो, तर तपकिरी डोक्याचा तांबट हा संजय गांधी राष्ट्रिय उद्यान तर पांढ-या गालाचा तांबट हा पश्चिम घाटात दिसतो. आपल्याकडे दिसणारा तांबट पक्ष्याला रसाळ फळ खायला भरपूर आव़डत असून काहीवेळा छोटे किटकावर ताव मारतो. एरवी गर्द झाडांमध्ये लपून बसलेला असतो, परंतु सध्या पानगळतीचा हंगाम असल्याने हा पक्षी वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशा झाडांवर बसलेला दिसतात. मंदार बापट (पक्षी अभ्यासक)

टॅग्स :thaneठाणे