शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तालुका कृषी कार्यालय वर्षानुवर्षे भाड्याच्या खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 03:59 IST

किन्हवलीतील शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड : योजनांसाठी जावे लागते तालुक्याला, बसण्यासाठी जागेचा अभाव

वसंत पानसरेकिन्हवली : किन्हवली परिसरात बहुतांशी शेतकरी असून उपजीविकेसाठी शेतीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध योजनांची माहिती घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. परिणामी, किन्हवली भागातील शेतकऱ्यांना याचा नाहक भूर्दंड सहन करावा लागतो आहे. त्यामुळे कृषी मंडळ कार्यालय किन्हवलीत सुरू करण्याची मागणी या शेतकºयांनी केली आहे.शासकीय कृषी विभाग कार्यालय कित्येक वर्षांपासून भाड्याच्या घरात असल्याने शहापूर तालुक्यातील शेतकºयांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. तालुक्यातील लाखो शेतकरी शेतीसह फळबाग, फुलबाग, फळभाज्या लागवडीवर भर देतात. शासनाच्या विविध योजनांबाबत कृषी अधिकारी तसेच कर्मचारी त्यांना मार्गदर्शन करतात. मात्र, या शेतकºयांना तालुका कृषी कार्यालयात बसण्याचीही जागा नसून वाहने अडगळीत उभी करावी लागतात.

कृषी विभाग कार्यालय भाड्याच्या घरात असून येथे अनेक समस्या आहेत. शेती विषयक आणि शासकीय योजनांचे माहिती फलक उपलब्ध नसून नोटीस बोर्ड तसेच पिण्याच्या पाण्याची आणि बैठकीची पुरेशी सोय नसल्याने शेतकºयांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शेतकºयांची ही परिस्थिती तर शासकीय कर्मचाºयांना देखील बसण्याची आणि उपकरणे ठेवण्याची पुरेशी जागा नसल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, शहापूर तालुका कृषी विभागासाठी स्वतंत्र कार्यालयाची मागणी तालुक्यात जोर धरते आहे. तालुक्यात कार्यरत असणारे सहायक तसेच पर्यवेक्षक शेतकºयांच्या भेटीसाठी जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. किन्हवली मंडळ कार्यालय हे शहापुरातच असल्याने या भागातील शेतकºयांना शहापूरला यावे लागते. आदिवासीबहुल तालुका असणाºया शहापुरात शेती हा मुख्य व्यवसाय असून शेती हे उपजीविकेचे साधन आहे. तालुक्यात योजना केवळ कागदोपत्री राबविल्या जात असल्याचा आरोप होत आहे.खर्डी, किन्हवली, शहापूर या तीन मंडळात ३८ कृषी सहाय्यक आहेत. तालुक्यातील शेतकºयांना शेतीबाबत माहिती तसेच मार्गदर्शनाची गरज असून मंडळ अधिकाºयांसह कृषी सहाय्यकांनी गावागावात जाऊन शेतकºयांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.शासन परिपत्रकानुसार कृषी मंडळ कार्यालय तालुक्याच्याच ठिकाणी असते. मात्र, किन्हवलीतील शेतकºयांसाठी आम्ही किन्हवली ग्रा.पं.मध्ये गॅझेट आॅफिसर बसवत होतो. शेतकºयांची गैरसोय होत असेल तर ग्रामपंचायतीला पत्र देऊन तिथे जर गॅझेट आॅफिसर बसण्याची व्यवस्था झाली, तर आम्ही तिथे गॅझेट आॅफिसर बसवू.- दिलीप कापडणीस,कृषी अधिकारी, शहापूर

टॅग्स :thaneठाणेagricultureशेती