शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या तीन दिवसांच्या ‘ड्राय डे’मुळे तळीरामांची मोठी गोची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 06:16 IST

कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ६ ते रविवारी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (२९ एप्रिल) ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय-डे’ घोषित केला आहे.

जितेंद्र कालेकर ठाणे : कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ६ ते रविवारी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (२९ एप्रिल) ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय-डे’ घोषित केला आहे. पण, मुंबईत मात्र सोमवारी सायंकाळी ६ नंतर देशी विदेशी दारूची दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे ठाण्यातील तळीरामांची गोची झाली असून, या तीन दिवसांमध्ये शासनाचाही सुमारे साडेचार कोटींचा, तर मद्य व्यावसायिकांचाही सुमारे १५ कोटींचा व्यवसाय बुडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून दारूचीबेकायदेशीर विक्री आणि निर्मितीला प्रशासनाने आळा घातला. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके त्यासाठी कार्यरत होती. लाखो लीटर दारू आणि रसायन या काळात जप्त करून नष्ट केले. आता परवानाधारक देशी, विदेशी मद्य, बीअर तसेच ताडीच्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना २७ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजल्यापासून विक्रीला बंदी केली आहे. त्यानंतर, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात २८ एप्रिल तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी आणि मतमोजणीच्या दिवशी म्हणजे २३ मे रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मुंबईतही याच चार दिवसांमध्ये मद्यविक्रीला बंदी केली आहे. परंतु, तिथे मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ पर्यंत ही बंदी आहे. त्यामुळे ठाण्यात जरी त्यादिवशी सायंकाळी ६ नंतर मद्याची दुकाने बंद असली, तरी मुंंबईत ही सोय होणार असल्यामुळे ठाण्यातील तळीरामांची काहीशी पंचाईत होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात दिवसाला सरासरी एक लाख लीटर दारू रिचवली जाते. त्यापोटी दिवसाचा दीड कोटीचा महसूल गृहीत धरला, तरी तीन दिवसांमध्ये साडेचार कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार देशी, विदेशी मद्य, ताडी आणि बीअरविक्रेत्यांचाही यात दिवसाचा पाच कोटींप्रमाणे सुमारे १५ कोटींचा व्यवसाय बुडणार आहे. त्यातही मुंबईत जर २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ नंतर दुकाने खुली राहण्यास अनुमती असेल, तर ठाण्यातही तशी परवानगी मिळण्यासाठी मद्यविक्रेत्यांकडून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मतदानाची वेळ २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ पर्यंत आहे. त्यानंतर मतदान अधिकारी मतदानकेंद्रावरून पॅकिंग आणि इतर प्रक्रिया करून मुख्यालयात येईपर्यंत रात्री उशीर होतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव २९ एप्रिल रोजी संपूर्ण दिवसभर मद्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. - राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकVotingमतदान