शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

बैठकीत तोडगा काढा; अन्यथा ७० कोटी भरा

By admin | Updated: January 14, 2017 06:04 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाविरोधातील याचिकेवर १० जानेवारीला राष्ट्रीय हरित लवादाच्या

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाविरोधातील याचिकेवर १० जानेवारीला राष्ट्रीय हरित लवादाच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यात लवादाने पालिकेला पालघर व ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह कोकण विभागीय आयुक्त व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) तज्ज्ञांसोबत ७ फेब्रुवारीपूर्वी बैठक घेऊन तोडगा काढा, अन्यथा ७० कोटी भरण्याची तयारी करा, अशी समज पालिकेला दिली.पालिकेने २००८ मध्ये धावगी-डोंगर येथे सुरू केलेला बीओटी तत्त्वावरील घनकचरा प्रकल्प बंद पडल्यानंतर सध्या उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यावर प्रक्रिया होत नसल्याने त्यातील सांडपाणी व दुर्गंधीसह साठणाऱ्या कचऱ्याला सतत आग लागत असल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. हा प्रकल्पच इतरत्र स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादाकडे मे २०१५ मध्ये याचिका दाखल केली. तत्पूर्वी पालिकेने हा प्रकल्प वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली. परंतु, जागेच्या सातबाऱ्यावर अद्याप पालिकेचे नाव आलेले नाही. त्यातच ही जागा वन विभागांतर्गत येत असल्याने त्याला विभागाने अद्याप परवानगी दिलेली नाही. याठिकाणी पालिकेला बीओटी तत्त्वावर वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करायचा असला, तरी सकवार ग्रामस्थांनी त्याला विरोध दर्शवला आहे. यामुळे स्थलांतराच्या कोंडीत सापडलेल्या प्रकल्पासाठी सौराष्ट्र एनव्हायर्नमेंट या एकमेव कंपनीने निविदा भरली आहे. त्यासाठी पालिकेने कंपनीकडून ५० लाखांची बँक गॅरंटी घेतली असून प्रत्येक टन कचऱ्यामागे ७०० रुपये निश्चित केले आहे. तसेच लवादाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सध्याच्या प्रकल्पातील कचऱ्यावर ठोस प्रक्रिया केलेली नाही.त्यामुळे लवादाने पालिकेला चांगलेच फैलावर घेतले. एमपीसीबीने कचरा साठवण्याची परवानगी दिली का, असे विचारले असता त्यावर नाही, असे उत्तर येताच लवादाने घनकचरा प्रकल्प कचरा साठवण्यासाठी नाही, तर त्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.