शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘औषधफवारणी कामगारांना कामावर घ्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 06:16 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने आर्थिक दिवाळखोरीचे कारण देत एकात्मिक डासनिर्मूलन योजनेंतर्गत औषधफवारणी करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने आर्थिक दिवाळखोरीचे कारण देत एकात्मिक डासनिर्मूलन योजनेंतर्गत औषधफवारणी करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले. याला जबाबदार असणा-या अधिका-यांवर त्वरित कारवाई करा, तसेच कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सामावून घेण्याचे निर्देश स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी दिले.एकात्मिक डासनिर्मूलन योजनेच्या लेखाशीर्षकाखाली आरोग्य विभागाकडून दरवर्षी सुमारे १० कोटींची केवळ औषधेच खरेदी केली जातात. तर, कामगारांच्या वेतनापोटी दोन कोटी खर्च होतात. मात्र, प्रस्तावित तरतुदीत प्रशासनाने सुमारे १० कोटींची कपात करून केवळ दोन कोटींचीच तरतूद एकात्मिक डासनिर्मूलनासाठी केली. त्यामुळे फवारणीच्या वार्षिक खर्चाबाबत आरोग्य विभाग चिंताग्रस्त होता. त्यात स्थायी समितीने एक कोटींची वाढ केली.तरीही, औषधफवारणीचा खर्च भागवणे दुरापास्त होणार असल्याने आरोग्य विभागाने औषधफवारणी करणाºया सर्व १५१ कर्मचाºयांवर संक्रांत आणण्याचा निर्णय घेतला. पुरेशा निधीअभावी कामगारांसह ३० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकले.औषधफवारणीसाठी आवश्यक निधी आरोग्य विभागाने प्रस्तावित केला असताना तो प्रशासनानेच कमी केल्याचा आरोप त्यांनी केला. कमी केलेल्या तरतुदीत उलट स्थायीने ५० टक्के वाढ करूनही स्थायीच्या बदनामीचे षड्यंत्र रचण्यात आल्याने पाटील यांनी अधिकाºयांचा समाचार घेतला.औषधफवारणीसाठी १०० गृहनिर्माण संस्थांनी पालिकेशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे आयुक्त बळीराम पवार यांनी त्या कामगारांना नवीन कंत्राटात प्राधान्याने सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकnewsबातम्या