शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

रेल्वेच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढा, खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 01:21 IST

मध्य रेल्वे महिनाभर विविध कारणांमुळे विलंबाने धावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा...

डोंबिवली - मध्य रेल्वे महिनाभर विविध कारणांमुळे विलंबाने धावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे भेटीदरम्यान केली. तत्पूर्वी त्यांनी या प्रश्नाबद्दल लोकसभेत आवाज उठवला. उपनगरी सेवेचा वारंवार बोजवारा उडत असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होईल, अशी भीती शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात व्यक्त केली.

रेल्वे ही मुंबईकरांची जीवनरेषा आहे. दररोज ४२ लाख ५० हजार प्रवासी लोकलने प्रवास करतात. तर, लोकलच्या दररोज एक हजार ७७२ फेऱ्या होतात. मात्र, महिनाभर लोकल विलंबाने धावत आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने नोकरदारांना बसत आहे. कार्यालयात पोहोचायला विलंब होत असल्याने लेटमार्क लागत आहे. मेगाब्लॉक घेऊनही रेल्वे वेळेवर धावत नाही. उपनगरी सेवेतून सर्वाधिक महसूल मिळूनही येथे समस्यांचे प्रमाण अधिक आहे. आठवड्यातून पाच वेळा वेळापत्रक बिघडलेले असते, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.लोकलचा खोळंबा झाल्यास विनाविलंब जलद लोकल धीम्या मार्गावर अथवा धीम्या लोकल जलद मार्गावर वळवाव्यात. कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तेथे जादा लोकल सोडाव्यात, अशीही मागणी शिंदे यांनी यावेळी केली.रुळांमध्ये पाणी साचू देऊ नकारेल्वेच्या नालेसफाईसंदर्भात शंका उपस्थित होत आहे. पावसाळ्यात रुळांमध्ये पाणी तुंबू नये, यासाठी रुळांपासून १० मीटर अंतरावर संरक्षक भिंत बांधावी. जेथे जास्त पाणी साचते, तेथे अधिक अश्वशक्तीचे पंप लावून पाणी काढावे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलpiyush goyalपीयुष गोयल