शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक घ्या, अन्यथा आंदोलन करू; परिवहन सभापती निवडणूक रद्दच्या निर्णयावर भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 18:03 IST

सोमवारी आमदार रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर केलेल्या चर्चेनंतर कोकण आयुक्तांना निवडणूक घेण्यासंदर्भात निवेदन देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याण:  कोरोनाच्या प्रादुर्भावात रखडलेली परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होणार होती. यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्त लौकेश चंद्र यांनी परिपत्रक जारी केले होते. परंतू शुक्रवारी नवे आदेश काढत निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाला भाजप सदस्यांनी हरकत घेतली असून निवडणूक घ्या अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा आक्रमक पवित्र त्यांनी घेतला आहे. सोमवारी आमदार रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर केलेल्या चर्चेनंतर कोकण आयुक्तांना निवडणूक घेण्यासंदर्भात निवेदन देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.सभापती निवडीची सभा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात येणार होती. ऑनलाईन पध्दतीने होणारी ही निवडणूक राज्यातील पहिलीच निवडणूक ठरणार होती. दरम्यान ऑनलाईन प्रक्रियेला सभापती मनोज चौधरी यांनी मात्र हरकत घेतली होती. ठाणो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड जशी करण्यात आली तशीच लोकशाही पध्दतीने निवडणूक घ्या असे पत्र त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पाठवले होते. दरम्यान महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या स्थायी समिती, विषय समितीच्या निवडणूका, सदस्य निवडणूका पुढील आदेशार्पयत स्थगित करणोबाबत निर्देश आहेत त्याप्रमाणो पुढील आदेशार्पयत परिवहन समिती सभापती निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे कोकण विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. परिवहन समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत.समितीमधील शिवसेनेचे सदस्य मधुकर यशवंतराव यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाल्याने शिवसेनेची एक जागा रिक्त आहे. दरम्यान स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिध्द सदस्य असतो. स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे आहे. संख्याबळाच्या आधारे सभापतीपदाच्या निवडणूकीत भाजपचेच पारडे जड आहे. परंतू निवडणूक रद्द झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मात्र आता भाजप सदस्यांनी निवडणूक ही झालीच पाहिजे असा आक्रमक पवित्र घेतला आहे. सदस्यांनी भाजपचे  प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रविंद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत निवडणूक घेण्याची मागणी करणारे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना देण्याचे ठरले आहे. जर निवडणूक नाही घेतली तर आंदोलनाचा पवित्र घेण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे अशी माहीती परिवहन सदस्य संजय मोरे यांनी दिली.