शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन चालकांवर कठोर कारवाई करा; रिक्षा युनियनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 00:54 IST

रिक्षा युनियनने केली आरटीओकडे मागणी : सुविधा न मिळाल्यास आंदोलन

डोंबिवली : रिक्षाचालकांमध्ये अल्पवयीन मुले दिसताच त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करा. नियम धाब्यावर बसवून कोणी रिक्षा चालवत असेल, तर संबंधितांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी डोंबिवली पश्चिमेकडील रिक्षा-चालक-मालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांच्याकडे केली. त्याचवेळी वाहनांची तपासणी, पासिंगसाठी रिक्षाचालकांना असुविधांचा सामना करावा लागत असल्याचे सांगून यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ससाणे आणि युनियन यांच्यात कल्याणमध्ये गुरुवारी बैठक झाली. त्यावेळी युनियनचे अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, भिकाजी झाडे, कैलास जाधव, उदय शेट्टी आदींसह रिक्षाचालक उपस्थित होते. आमच्या रिक्षाचालकांना पासिंगसाठी तासन्तास थांबावे लागत आहे. पहिल्या दिवशी पासिंग न झाल्यास दुसºया, तिसºया दिवशीही फेरी मारावी लागत आहे. त्यामुळे नांदिवली येथील नव्या जागेतील असुविधा लवकर दूर कराव्यात, अशी मागणी युनियनतर्फे करण्यात आली आहे.

जोशी म्हणाले की, आरटीओकडे असुविधांबाबत वारंवार तक्रारी करूनही काहीच झालेले नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसायाचा खाडा करावा लागत आहे. याआधीही ससाणे यांची भेट घेऊ न याबाबत तक्रारी केल्या होत्या. तसेच २५ जूनला आरटीओ अधिकाऱ्यांना पत्रही दिले; मात्र त्यात कुठलीच सुधारणा झालेली नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, मनसेच्या वाहतूकसेनेतर्फेबुधवारी आरटीओला निवेदन देण्यात आले. फेरीवाला, वाहतूककोंडी, पत्रीपूलकोंडी, मुरबाडच्या काळ्या-पिवळ्या जीपचा बेकायदा थांबा याबाबत अधिकाºयांना प्रत्यक्ष निवेदन दिले. यावर सात दिवसांत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळी कल्याण महिला शहराध्यक्ष शीतल विकेनकर, चेतना रामचंद्रन, शहर सचिव अर्चना चेंदरकर, अमित घमंडी, गणेश सोनावणे यांच्यासह महिला व पुरु ष पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.जोशी, म्हात्रे यांच्यासह युनियन पदाधिकाºयांनी माझी भेट घेतली. पासिंगसाठी रिक्षाचालकांना वेळ वाढवून देण्यात येईल, तसेच युनियनच्या अन्य मागण्यांबाबत प्राधान्यक्र म देत सगळ्याच रिक्षाचालकांच्या समस्या सोडवण्यात येतील. नांदिवली सेक्शन आताच सुरू झाले आहे. थोडे सहकार्य करावे, तिथेही सुविधा मिळतील. - संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा