मुंब्रा : स्वत:च्या पदाचा गैरवापर करून अपंगांच्या स्टॉलवर कारवाई करुन त्यांना बेरोजगार करणाऱ्या मुंब्रा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी अपंगांच्या संघटनेने राज्याच्या मानवी हक्क आयोगाकडे केली आहे.काही दिवसांपासून मुंब्रा-कौसा परिसरात रस्ता रु ंदीकरणाची मोहीम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत रस्तारु ंदीच्या आड न येणाऱ्या काही अपंगांच्या स्टॉलवर देखील कारवाई केली. तर काही स्टॉलधारकांवर स्थलांतरासाठी दबाव टाकल्याचा दावा संघटना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या स्टॉलना काही वर्षापूर्वी पालिकेनेच परवानगी दिली होती. तसेच आर्थिक मदत केली होती. असे असतानाही मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे त्यांच्या पदाचा गैरवापर करु न अपंगाच्या स्टॉलवर आकसाने कारवाई करत असल्याचा आरोप बृहन्महाराष्ट्र अपंग विकास कामगार संघटनेने केला असून, पाटोळे यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची आणि अपंगांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेचे सचिव युसूफ खान यांनी केली आहे. (वार्ताहर)
पालिका सहायक आयुक्तांवर कारवाई करा
By admin | Updated: June 6, 2016 01:26 IST