शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 15:50 IST

ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ठळक मुद्देज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. गायतोंडे यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.ज्येष्ठ तबदलावादक पं. अहमदजान थिरकवा यांचे शेवटचे शिष्य अशी भाईंची ओळख होती.

ठाणे - ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायतोंडे यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. दिलीप गायतोंडे, मुलगी असा परिवार आहे. 

ज्येष्ठ तबदलावादक पं. अहमदजान थिरकवा यांचे शेवटचे शिष्य अशी भाईंची ओळख होती. पेशाने केमिकल इंजिनिअर असूनही तबलावादनाकडे त्यांचा कल अधिक होता. पं. जगन्नाथबुवा पुरोहित अर्थात गुणीदास यांच्याकडे त्यांनी अनेक वर्ष तबलावदानाचे धडे गिरविले, त्याचप्रमाणे ज्येष्ठ तबलावादक पं. अहमदजान थिरकवा यांच्याकडेही त्यांनी तालीम घेतली होती. 

नोकरी, तबलावादनाचा सराव यांच्यासह क्रिकेटची आवड असलेल्या त्यांनी रणजी क्रिकेटमध्येही छाप पाडली होती. तबलावादन ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी देशातील अनेक विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. लखनऊ, दिल्ली येथील अनेक विद्यापीठांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांमध्ये ते मानद व्याख्याते म्हणून कार्यरत होते. 

वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात १५ जून रोजी त्यांनी अखेरचे व्याख्यान दिले. विद्यापीठांसह राहत्या घरीही त्यांनी सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांना तबल्याचे निः शुल्क प्रशिक्षण दिले. तबल्याचं सौंदर्यशास्त्र या विषयावर त्यांचा अभ्यास होता. 

पं. राम मराठे, पं. सी आर व्यास, पं. यशवंतबुवा जोशी, पं. निळकंठ बुवा अभ्यंकर, पंडिता माणिक वर्मा यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांसह त्यांनी अनेक कार्यक्रमात साथ केली होती. तबला वादन या विषयावर त्यांची अनेक पुस्तके लिहिली. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक मानसन्मान लाभले. संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. 

टॅग्स :thaneठाणे