शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तरणतलाव, व्यायामशाळा राहणार सुरू , जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 03:14 IST

निवडणूक आयोगाने साहित्य ठेवण्यासाठी शहरातील क्रीडासंकुलाचा घेतलेला ताबा आणि त्यामुळे तरणतलाव, व्यायामशाळेच्या वापरावर येणारे निर्बंध पाहता बुधवारी व्यायामपटूंनी प्रतीकात्मक आंदोलन केले.

डोंबिवली  - निवडणूक आयोगाने साहित्य ठेवण्यासाठी शहरातील क्रीडासंकुलाचा घेतलेला ताबा आणि त्यामुळे तरणतलाव, व्यायामशाळेच्या वापरावर येणारे निर्बंध पाहता बुधवारी व्यायामपटूंनी प्रतीकात्मक आंदोलन केले. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्याची दखल घेतली. नार्वेकर यांनी अन्य अधिकाऱ्यांसह सध्या बंद असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील बेसमेंटच्या जागेची पाहणी केली. त्यामुळे या जागेचा वापर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी होण्याची शक्यता आहे. याबाबतचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होईल.कल्याण लोकसभा मतदारसंघाचे मतदान २९ एप्रिलला होणार आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान लागणारे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या मालमत्तांचा ताबा घेतला आहे. त्यामुळे क्रीडासंकुलातील व्यायामशाळा व जलतरण तलाव बंद करून मुलांच्या खेळावर टाच आणू नये, असे पत्र शिवसेनेचे कल्याण ग्रामीण व पूर्व विधानसभा संघटक कैलास शिंदे यांनी निवडणूक विभागाला दिले होते.केडीएमसीचे सभागृह नेते श्रेयस समेळ यांनीही आयुक्तांना पत्र पाठवून तलावाची जागा देऊ नका, असे स्पष्ट केले होते. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. परंतु, नार्वेकर यांच्या पत्रानुसार महापालिका प्रशासनाने जागेचा ताबा निवडणूक विभागाकडे दिला. त्याचा निषेध म्हणून व्यायामपटूंनी नार्वेकर यांना निवेदन दिले. तसेच बुधवारी क्रीडासंकुलात व्यायामाचे साहित्य ठेवून प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी व्यायामपटूही सहभागी झाले होते. खेळाडूंच्या खेळावर विरजण पडू नये, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले नाट्यगृह घेतल्यास सर्व बाजूने सोयीस्कर होईल, याकडे व्यायामपटूंनी लक्ष वेधले होते.सध्या नाट्यगृहाच्या वातानुकूलित यंत्रणेचे काम सुरू असल्याने ते बंद आहे. त्यामुळे या जागेचा वापर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, तरणतलाव व व्यायामशाळा सुरू राहणार असल्याने खेळाडूंनी आनंद व्यक्त केला आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे