शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई दुकानांनी नियम बसवला धाब्यावर तर काहींनी केलं नियमांचं पालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 16:45 IST

Sweet Shop Mithai : मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी दिनांक म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रे समोर लिहीणे अन्न व औषध प्रशासनातर्फे बंधनकारक करण्यात आले आहे

कुलदीप घायवट

कल्याण - आता नवरात्री, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त मोठ्याप्रमाणात मिठाईची खरेदी ग्राहकांकडून केली जाते.  मात्र ग्राहकांना विकत घेतलेली मिठाई किती कालावधीपर्यंत खाता येईल, याची माहिती मिळत नाही. यासाठी मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी दिनांक म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रे समोर लिहीणे अन्न व औषध प्रशासनातर्फे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मिठाई दुकानदारांनी हा नियम धाब्यावर बसविला आहे. महापालिका क्षेत्रातील ७ दुकानांची पाहणी केली असता, फक्त दोन नामांकित मिठाई दुकानदारांनी नियमांची अंमलबजावणी केली असल्याचे दिसून आले. 

अन्न व औषध प्रशासनाने १ ऑक्टोबर २०२० पासून प्रत्येक खुल्या मिठाईच्या ट्रे वर बेस्ट बिफोर दिनांक टाकल्याचे बंधनकारक केले आहे. विक्रेत्यांना या नियमांचे पालन न  केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र कल्याण येथील रामबाग, संतोषी माता रोड, गौशाळा रोड येथील दुकानांची पाहणी केली असता, कोणत्याही विक्रेत्याने नियमांचे पालन केले नाही. तर, डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड आणि कल्याण रेल्वे स्थानक रोड येथील झुंजारराव नगर येथील नामांकित मिठाई विक्रेत्यांनी नियमांची अंमलबजावणी केली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन केले जात आहे. याबाबत ग्राहकांमध्येही जागृती आहे. या नवीन पध्दतीचे ग्राहकांकडून स्वागत केले जात आहे. सध्या बाजारातील रेलचेल कमी आहे. असे, मिठाई विक्रेते श्रीपाद कुळकर्णी म्हणाले.

खूप चांगला नियम शासनाने सुरू केला आहे. यामुळे दुकानदारांकडून होणारी फसवणूक कमी होईल. शिळी मिठाई खाऊन विषबाधा होणाऱ्या घटनेवर लगाम लागेल, अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली. दरम्यान, लाडूसारखी मिठाई तीन-चार दिवस टिकते. मग दोनच दिवस त्याची बेस्ट बिफॉर का आहे. काहीवेळा बाहेरगावी जाताना, नातेवाईकांना मिठाई घेऊन जाताना आदल्या दिवशी खरेदी केली जाते. त्यानंतर इच्छितस्थळी पोहचेपर्यंत मिठाई बेस्ट बिफॉरची तारीख निघून जाते, मग ती मिठाई शिळी होईल का, असे प्रश्न ग्राहकांच्या ग्राहकांच्या मनात तयार झाले आहेत. 

शासनाकडून, अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या नियमाचे त्वरित पालन केले. सर्व मिठाईच्या ट्रे समोर बेस्ट बिफॉर याची माहिती लिहिली आहे. ग्राहक मिठाई खरेदी करताना, खाताना नेहमी जागृत असतात. काही ग्राहक यासंदर्भात अनभिज्ञ असतात. ग्राहकांनी सजग राहून दुधाची मिठाई २४ तास तर, लाडू, मोतीचूर यांसारखी मिठाई ४८ तासांच्या आत खावी.

- भूषण गवळी, मिठाई विक्रेते 

.कल्याण, डोंबिवली येथील आठ दुकानांची पाहणी केली असता, येथील दुकानांदारांनी नियमांचे पालन केल्याचे आढळून आले. व्यापारी संघटनेशी संपर्क साधून नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत जागृत करत आहोत.

- धनंजय काडगे, सहाय्यक आयुक्त, अन्न सुरक्षा विभाग, कल्याण 

टॅग्स :foodअन्नkalyanकल्याण