शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जिल्ह्याला छमछम, नशा, जुगाराचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 23:39 IST

मीरा-भार्इंदर येथील आॅर्केस्ट्रा बार, लॉजवर मागील आठवड्यात झालेल्या कारवाईत मोठ्या संख्येने बारबाला, ग्राहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मीरा-भार्इंदर येथील आॅर्केस्ट्रा बार, लॉजवर मागील आठवड्यात झालेल्या कारवाईत मोठ्या संख्येने बारबाला, ग्राहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडे त्यांना पोलीस ठाण्यात नेण्याकरिता पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांची रस्त्यावरून ‘वरात’ काढली होती. मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी तसेच ठाणे येथे गेल्या काही महिन्यांत म्हणजे कोर्टाने आॅर्केस्ट्रा बारवरील निर्बंध शिथिल केल्यावर पुन्हा अक्षरश: धुमाकूळ सुरू झाला आहे. न्यायालयाने काही बंधने घालून परवानगी दिली असली तरी हप्तेखोरी व पळवाटा काढून त्या निर्बंधांना बगल दिली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांची बहुचर्चित डान्स बारबंदी इतिहास बनली आहे. ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी व ठाणे या शहरांतील डान्स बार व आॅर्केस्ट्रा बार, लॉज, जुगारांचे अड्डे, हुक्का पार्लर, मसाज पार्लर येथील अवैध धंद्यांचा ‘लोकमत’चे प्रतिनिधी धीरज परब, सदानंद नाईक, नितीन पंडित व पंकज रोडेकर यांनी घेतलेला आढावा...

रा-भार्इंदर शहर हे कोणतेही पर्यटनस्थळ नसले तरी शहरात तब्बल १३० च्या घरात लॉज व ५० च्या घरात आॅर्केस्ट्रा बार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने आॅर्केस्ट्रा बार व लॉज असणारे मीरा-भार्इंदर हे राज्यातील बहुधा एकमेव शहर आहे. शहरातील आॅर्केस्ट्रा बार व लॉजच्या आड अय्याशीचे आणि अनैतिक व्यवसायाचे अड्डे तयार झालेले आहेत. मीरा-भार्इंदर, वसई, ठाणे व राज्यातीलच नव्हे तर अगदी गुजरात, राजस्थान आदी परराज्यांतील अय्याशांसाठी मीरा-भार्इंदर पर्वणी ठरले आहे. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, महसूल, महापालिका आणि राजकारण्यांशी लागेबांधे असल्याने अनैतिक व्यवसायातून बख्खळ काळ्या कमाईचा हा अनैतिक धंदा मीरा-भार्इंदरमध्ये राजरोस सुरू आहे.

लॉज व बार विकृतीमुळे शहराचे नाव बदनाम झालेले आहे. यातून तरुण पिढीसह असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे सोयरसुतक या हप्तेवसुली करणाऱ्या यंत्रणांसह स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणवणाºया राजकारण्यांना नाही. समाजाचे आणि शहराचे काय वाटोळे व्हायचे ते होऊ देत. यांच्यासाठी पैसा हाच मायबाप आहे. मग तो कोणत्याही मार्गाने का मिळेना. आॅर्केस्ट्रा बार व लॉजच नव्हे तर मसाज पार्लर आणि आता भावी पिढीला नशेच्या आहारी लावणारे हुक्का पार्लर हे निव्वळ हप्तेवसुलीचे चराऊ कुरण बनले आहेत. समाजात आपण काय विकृती पोसतोय, याचे भान या यंत्रणांना उरलेले नाही.

शहरात १३० च्या घरात लॉज आहेत. त्यातही बहुतांश लॉज हे आॅर्केस्ट्रा बार वा बारलगत आहेत. शहरातील लॉजच्या संख्येचा विचार केला तर निश्चितच इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक येत नाहीत, हे जगजाहीर आहे. मग लॉजचा धंदा होतो कसा आणि नवनवे लॉज शहरात सुरु कसे होतात? असा प्रश्न पडतोच. कारण, बहुतांश लॉज हे ‘चद्दर पलटी लॉज’ म्हणून कुख्यात आहेत. आॅर्केस्ट्रा बारमध्ये बारबालेशी सौदा ठरला की लगतच्याच लॉजमध्ये पुढची सोय असते. लॉजमध्ये वेश्या व्यवसायासाठी तरुणी एका खोलीत आणून ठेवलेल्या असतात. गिºहाइकाने मागणी केली की, त्याच्यासमोर दोन-चार तरुणी उभ्या केल्या जातात. गिºहाइकाला जी आवडली की, त्याने तिच्यासोबत मौजमजा करायची, असा हा मामला आहे. काही ठिकाणी बाहेरुन तरुणींना बोलावले जाते. वेश्या व्यवसायासाठी लॉजमध्ये कमी व जास्त वेळेनुसार दर ठरतो. मग तो दीड-दोन हजारांपासून ४ ते ५ हजारांपर्यंत असतो. लॉजच्या खोलीचे भाडे हजार रुपयांपासून पुढे घेतले जाते. वेश्यागमनासाठी तरुणीला दिलेल्या पैशांमधून वाटणी केली जाते. सर्वच रक्कम तरुणीला दिली जात नाही. त्यात लॉजचालकाचा पण हिस्सा असतो. मागणीनुसार लॉजमध्ये दारूपासून काय हवे ते वेटरकडून पुरवले जाते. लॉजमध्ये नोंद करताना केवळ गिºहाइकाची केली जाते. ग्राहक नेहमीचा झाला की, अगदी मोबाइलवरून बुकिंग घेतले जाते. नवीन गिºहाईक असेल तरी त्याला कायमचे जोडण्याच्या हेतूने सर्व सुविधा पुरवल्या जातात. वेश्या व्यवसाय करणारी तरुणी ग्राहकाला दारू व खाण्याचे पदार्थ मागवण्याचा आग्रह करतात. शिवाय प्रवासभाडे व टीप वेगळी मागतात. त्यातदेखील काहींचे कमिशन ठरलेले असते. एकंदर लॉजमधून मिळणारी कमाई घसघशीत असते. त्यामुळेच शहरात गल्लोगल्ली लॉज उघडले आहेत. अवैध धंदे सुरु असल्याची पूर्ण कल्पना असतानाही पोलिसांकडून लॉजवर क्वचितच कारवाई केली जाते.

शहरातील आॅर्केस्ट्रा बारमध्ये सर्रास अश्लील आणि अनैतिक प्रकार चालतात. नियमानुसार आॅर्केस्ट्रा सादरीकरणासाठी केवळ चार महिला कलाकारांना रात्री दीड वाजेपर्यंत बारमध्ये थांबवण्याची मुभा आहे. महिला वेटर म्हणून ठेवण्यास संख्येची मर्यादा नसली तरी रात्री साडेनऊ पर्यंतच महिला वेटर बारमध्ये ठेवता येतात. पण आॅर्केस्ट्रा कलाकारांच्या आड सर्रास बारबालाच ठेवल्या जातात. या बारमध्ये कलाकार गाणी म्हणतच नाहीत. म्युझिक सिस्टीमवर गाणी वाजवली जातात आणि बारबाला केवळ तोंडाने हावभाव करीत असतात. आॅर्केस्ट्रा कलाकारांच्या नावाखाली चार बारबाला तर असतातच, पण अन्य मोठ्या संख्येने बारबाला ठेवल्या जातात. रात्री उशिरापर्यंत तोकड्या व मादक कपड्यांमध्ये या बारबालांचा अश्लील धिंगाणा सुरू असतो. आॅर्केस्ट्रा बारमध्ये नृत्यास मनाई असली तरी सर्रास बारबालांचा नाच सुरू असतो. ग्राहकांकडून बारबालांवर नोटांची उधळण केली जाते. अगदी काही तासांत हजारो-लाखो रुपये बारबालांवर उधळले जातात. जास्त नोटा उधळणारे ग्राहक हे या बारबाला आणि बारवाल्यांचे सावज असतात. ग्राहकाचे बारबालाशी सूत जुळले की, आजूबाजूचा लॉज ठरलेला असतो. बहुतांश बारबाला तर नेहमी येणाºया ग्राहकाशी दीर्घकाळासाठी संबंध जोडतात. गोडीगुलाबीने ग्राहकाची लूट केली जाते.