शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगार लखपती, अंबरनाथच्या मनीष पाटीलने जिंकले १२.५० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:56 IST

लहान पडद्यावरील एका लोकप्रिय प्रश्नमंजूषा स्पर्धेत अंबरनाथमधील एका सफाई कामगाराने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. बक्षिसापेक्षा महानायकासमोर बसण्याची संधी मिळाली, याचा आनंद जास्त असल्याचे मत विजेते मनीष पाटील यांनी व्यक्त केले.

अंबरनाथ - लहान पडद्यावरील एका लोकप्रिय प्रश्नमंजूषा स्पर्धेत अंबरनाथमधील एका सफाई कामगाराने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. बक्षिसापेक्षा महानायकासमोर बसण्याची संधी मिळाली, याचा आनंद जास्त असल्याचे मत विजेते मनीष पाटील यांनी व्यक्त केले.मूळचे राजापूरचे रहिवासी असलेले मनीष पाटील २० वर्षांपासून अंबरनाथ पालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. लहानपणापासूनच महानायक अमिताभ बच्चन यांचे जबरदस्त फॅन असलेल्या पाटील यांना त्यांच्या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाची आवड होती. तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर जून महिन्यात त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आधारकार्ड नंबर मागितला. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा गैरसमज होऊन त्यांनी फोन कट केला. मात्र, विश्वास बसल्यावर त्यांनी स्वत:ची माहिती या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिली. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांना ७ आणि ८ सप्टेंबर रोजी स्पर्धा खेळण्यासाठी बोलावण्यात आले. स्पर्धेत खेळण्यापेक्षा अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळणार असल्याची उत्सुकता त्यांना जास्त होती. त्यांचा मुलगा संदीप याला क्रिकेटची आवड असून स्पर्धेदरम्यान त्याच्यासाठी क्रिकेट किट मनीष यांना भेट म्हणून मिळाले.स्पर्धेदरम्यान मनीष यांनी १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. त्यानंतरचा प्रश्न २५ लाख रुपयांचा होता. त्याचे उत्तर चुकले असते, तर बक्षिसाची रक्कम तीन लाखांवर येणार होती. उत्तराची खात्री नसल्याने मनीष यांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेनंतर दुसऱ्याच दिवशीपासून मनीष त्यांच्या नियमित सफाईच्या कामात व्यस्त झाले. टीव्हीवर झळकल्यापासून प्रत्येकजण त्यांना ओळखू लागले आहे. प्रभागात सफाईचे काम करताना अनेकजण त्यांना याबद्दल विचारणा करतात.बक्षिसापेक्षा सन्मान महत्त्वाचामनीष नारायण पाटील यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना वाचनाची आवड आहे. काम आटोपल्यानंतर वाचन किंवा मोबाइलवर वेगवेगळी माहिती ते शोधत असतात. अमिताभ बच्चनसमोर त्यामुळेच ते बसू शकले. स्पर्धेत सहभागी झाल्यापासून जास्त सन्मान मिळत असल्याची भावना त्यांची पत्नी मानसी पाटील यांनी व्यक्त केली.या स्पर्धेत जिंकलेल्या रकमेतून करवगळता त्यांच्या हातात आठ ते नऊ लाख रुपये मिळणार आहेत. या पैशांतून मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनीष पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :newsबातम्या