शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हॅन्ड वॉशच्या मंजुर प्रस्तावाच्या विरोधात स्वाभीमानी संघटनेचे आंदोलन, शिक्षणाधीकाऱ्यांना दिले फिनाईल आणि बाटल्या भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:41 IST

सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या जोरावर दोन वर्षापूर्वी नामंजुर करण्यात आलेला प्रस्ताव आता मंजुर करुन घेतला आहे. आधी यासाठी ३३ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. आता मात्र त्यासाठीच १ कोटी ४० लाखांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे या चुकीच्या प्रस्तावाविरोधात स्वाभीमानी संघटनेने आंदोलन केले.

ठळक मुद्देन्यायालयात जाण्याचा दिला इशाराशाळेच्या स्वच्छतेकडे आधी लक्ष द्या

ठाणे - सत्ताधाऱ्यांनी जबरदस्तीने हर्बल हॅन्ड वॉशचा महागडा प्रस्ताव मंजुर केला असला तरी याच्या विरोधात आजही आवज उठत आहे. मंगळवारी स्वाभीमानी संघटनेच्या वतीने या मंजुर करण्यात आलेल्या चुकीच्या प्रस्तावाविरोधात शिक्षण मंडळाच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना शौचालयांच्या स्वच्छतेसाठी फिनाईलच्या आणि पाण्याच्या बाटल्या तसेच कडी कोयंडे भेट देण्यात आले. हा प्रस्ताव जर रद्द केला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.                         ठाणे नमहापालिकांच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या स्वच्छतेकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये हॅन्ड वॉश बसवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र हा प्रस्तावच आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून स्वाभिमानी संघटेनेचे ठाणे शहर अध्यक्ष विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नौपाडा येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. काही पालिका शाळांचीच परिस्थिती वाईट असून शौचालयांची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे. अनेक शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नाही. दरवाज्यांच्या कड्या तुटलेल्या आहेत, शौचालयांची स्वच्छता देखील होत नसून जर या मूलभूत सुविधाच मुलांना मिळत नसतील हा तर १ कोटी रु पये खर्च करून हॅन्ड वॉश खरेदी करण्याची आवश्यकताच काय असा सवाल त्रिपाठी यांनी उपस्थित केला आहे. हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या बाहेर यावेळी निदर्शने देखील करण्यात आली.     ठाणे महापालिकेच्या शाळांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, शाळांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, शाळांच्या इमारती दुरु स्त करण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांना देण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या गैरकारभाराच्या विरोधात आमदार नितेश राणे यांची देखील भेट घेणार असून शिक्षण मंत्र्याच्या माध्यमातून एखादी समिती गठीत करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांच्याशी संपर्क साधला असताना या संपूर्ण प्रस्तावाची माहिती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाSchoolशाळा