शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जप्तीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती! सिटी मॉलमधील ६५ गाळेधारकांना तात्पुरता दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 16:57 IST

येथील पेंढरकर महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या सिटी मॉलमधील पोटभाडेकरू गाळेधारकांच्या थकबाकीप्रकरणी भाडेधारकांना एमआयडीसीने भूखंड जप्तीच्या नोटीसा धाडल्या होत्या.

डोंबिवली: येथील पेंढरकर महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या सिटी मॉलमधील पोटभाडेकरू गाळेधारकांच्या थकबाकीप्रकरणी भाडेधारकांना एमआयडीसीने भूखंड जप्तीच्या नोटीसा धाडल्या होत्या. एकूण १६  करोड ३२  लाख ७४ हजार ३०० रूपये इतकी रक्कम न भरल्याने तसेच अटी शर्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत या मॉलमधील ६५ पोटभाडेकरूंचे गाळे व भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई उद्या ६ मार्चला सकाळी ११.३०  वाजता केली जाणार होती. परंतु या कारवाईला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. गाळेधारकांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले असून त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या कागदपत्रंची छाननी सुरू असल्याची माहिती ठाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र व्यवस्थापक संध्या घोडके यांनी दिली. याकारवाईला दिलेल्या स्थगितीमुळे गाळेधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सिटी मॉलला बजावलेल्या जप्तीच्या नोटीशीच्या एकंदरीतच प्रकरणाचा आजवरचा आढावा घेता सिटी मॉलचा भूखंड प्रारंभी कामगार राज्य विमा योजना रूग्णालयासाठी राखीव ठेवण्यात आला होता. परंतू नंतर तो भूखंड ताब्यात घेऊन ९५ वर्षाच्या भाडेपट्टयाने देण्यात आला. त्यावर सिटी मॉल ही इमारत उभारण्यात आली. सद्यस्थितीला या मॉलच्या इमारतीत विविध बँका, लग्नाचे हॉल, दुचाकी आणि चारचाकी गाडयांचे शोरूम्स यांसह ६५ पोटभाडेकरू गाळेधारक आहेत. दरम्यान ज्यांना हा भूखंड देण्यात आला होता त्यांनी या गाळयांचा वापर स्वत: करीता न क रता ते पोटभाडयाने दिले किंवा त्याची विक्री केली यासाठी एमआयडीसीची परवानगी घेतली नाही. इमारत पुर्णत्वाचा दाखला मुदतीत न घेता त्याचा वापर मात्र सुरू केला.  एमआयडीसीच्या परवानगीशिवाय गाळयांमध्ये अनधिकृतपणो पोटभाडेकरूचे व्यवसाय सुरू होते त्याबद्दल पोटभाडे शुल्क भरण्याबाबत दोनदा नोटीस बजावूनही त्या नोटिशीला संबंधितांकडून उत्तरही देण्यात आलेले नाही याकडे जप्तीच्या नोटीशीत लक्ष वेधले आहे. दरम्यान जप्तीची नोटीस बजावल्यावर सिटी मॉलमधील गाळेधारक एकत्र आले आणि  त्यांनी याप्रकरणी नुकतीच ठाणो एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी शारदा पोवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. आम्ही विकासकांकडून रजिस्टर सेल अॅग्रीमेंट केले असून बहुसंख्य गाळेधारक त्याचा स्वत: वापर करीत आहेत. एमआयडीसीच्या नियमानुसार मुदतीत आम्ही गाळे वापरात घेतले परंतू विकासकाने मुदतीत पुर्णत्वाचा दाखला न घेतल्याने आम्हाला एमआयडीसी हस्तांतरण व इतर परवानग्यांबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याकडे संबंधितांनी लक्ष वेधले. सेल अॅग्रीमेंट आणि मुदतीत ताबा घेतल्याचे पुरावे आम्ही सादर करीत असल्याचे स्पष्टीकरणही त्यांच्याकडून देण्यात आले. यावर पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले असून सादर होणा-या कागदपत्रंची जोर्पयत छाननी होत नाही तोर्पयत जप्तीच्या कारवाईला तात्पुरती स्थागिती देण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. आम्ही संबंधितांकडे उत्पादनाचे दाखले मागविले होते त्यानुसार काहीजणांनी कागदपत्रे सादर केली आहेत. त्याची छाननी सुरू  आहे छाननीअंती योग्य तो निर्णय घेतला जाईल तोपर्यंत जप्तीच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे अशी माहीती ठाणो एमआयडीसी क्षेत्र व्यवस्थापक घोडके यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली