शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आश्वासनानंतर उपोषण स्थगित

By admin | Updated: October 29, 2015 23:22 IST

लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पोल्ट्री व्यावसायिक यांची संयुक्त बैठक येत्या पंधरा दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात येईल

वाडा : लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पोल्ट्री व्यावसायिक यांची संयुक्त बैठक येत्या पंधरा दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांनी आपले उपोषण आ. विलास तरे यांच्या हस्ते थंड पेय घेऊन संपवले.शेतीला जोडधंदा म्हणून येथील शेतकरी कुक्कुटपालन हा व्यवसाय करतात. यासाठी लागणारे साहित्य सगुणा, व्यंकटेश्वरा, प्रीमिअम, आनंद अ‍ॅग्रो यासारख्या कंपन्या शेतकऱ्यांना पुरवतात. खराब हवामानात व्यवसायातील तोट्याला शेतकऱ्यांना जबाबदार धरतात आणि त्यांच्या हक्काचे आणि परिश्रमाचे पैसे कापून घेऊन कंपन्या मनमानी करतात. या कंपन्यांवर अंकुश आणावा, या मागणीसाठी वाड्यातील कुक्कुटपालन व्यावसायिकांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत आमदार विलास तरे यांनी गुरुवारी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर तरे यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून कुक्कुटपालन व्यवसायात शेतकऱ्यांची होणारी लूट त्यांच्या कानावर घातली. त्यानंतर, पालकमंत्री, वरिष्ठ अधिकारी, पोल्ट्री व्यावसायिक व कंपन्यांची संयुक्त बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण संपविण्यात आले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे या व्यवसायीकांत आशेचा किरण निर्माण झाला आहे. (वार्ताहर)