शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात भांडवली कर मूल्याला स्थगिती, नागरिकांना दिलासा; खासदार शिंदेंनी दसरा केला गोड

By सदानंद नाईक | Updated: October 6, 2022 17:56 IST

उल्हासनगरात शहरविकासाचे कामे राबविण्यासाठी भांडवली कर मूल्य प्रणाली प्रस्तावाला तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षांनी यापूर्वी मान्यता दिली.

उल्हासनगर - शहरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्याने, शासनाने १ एप्रिल २०२२ पासून लागू केलेल्या भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती दिली. पाणी समस्या पाठोपाठ भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती देऊन नागरिकांचा दसरा गोड केल्याची माहिती अरुण अशान यांनी दिली.

उल्हासनगरात शहरविकासाचे कामे राबविण्यासाठी भांडवली कर मूल्य प्रणाली प्रस्तावाला तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षांनी यापूर्वी मान्यता दिली. मान्यता दिली त्या वर्षांपासून महापालिकेने भांडवली कर मूल्य प्रणाली १ एप्रिल २०२२ पासून सुरुवात केली. भांडवली कर मूल्य प्रणालीमुळे नागरिकांना दामदुप्पट मालमत्ता कर बिले आल्याने, त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. दरम्यान भांडवली कर मूल्य प्रणाली आपल्या अंगलट येणार म्हणून काहीजण न्यायालयात गेली. तर आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून भांडवली कर मूल्य प्रणाली रद्द करण्याची मागणी केली. तर मनसेसह सामाजिक संघटना व अन्य पक्षांनी महाहस्ताक्षर अभियान राबविले.

राज्य शासनाने आमदार कुमार आयलानी यांच्या पत्रावरून महापालिका आयुक्तांना भांडवली कर मूल्याबाबत सद्यस्थितीचा अहवाल पाठविण्यास सांगितल्यावर, आयुक्त अजीज शेख यांनी भांडवली मूल्य करा बाबत वास्तवदर्शी अहवाल शासनाला गेल्या आठवड्यात  पाठविला. दरम्यान शिवसेना  शिंदे गटाचे अरुण अशान यांनी भांडवली कर मूल्य प्रणाली बाबतची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांना दिल्यावर, खासदार शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शासनाने भांडवली कर मूल्य प्रणाली प्रक्रियेला १ एप्रिल २०२२ पासून लावण्यास स्थगिती दिली. शिंदे सरकारच्या निर्णयाने नागरिकांना दसऱ्याला गोड बातमी मिळून दिलासा मिळाला. अशी प्रतिक्रिया अरुण अशान यांनी दिली. दसऱ्या पूर्वी शहरातील पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी एक्सप्रेस फिडर साठी एमआयडीसी कडून एनओसी देण्यात खासदार शिंदे यांना यश आले. तर शहाड पाणी पुरवठा केंद्र हस्तांतरणची मागणीही करण्यात आली. 

शहरवासीयांचा दसरा गोड

महापालिकेने भांडवली कर मूल्य प्रणालीद्वारे मालमत्ता कर दामदुप्पट आल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. मात्र पाणी समस्या सोडविण्या पाठोपाठ भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती दिल्याने, शहरवासीयांचा दसरा गोड झाला. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेulhasnagarउल्हासनगर