शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहप्राध्यापिकेचा विनयभंग करणारा प्राचार्य निलंबित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 20:32 IST

आपल्या सहप्राध्यापिकेचा वारंवार अश्लील चाळे करून विनयभंग करणाऱ्या घोडबंदर रोड येथील एका महाविद्यालयातील विलास शिंदे या प्राचार्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे, दि. ३ - आपल्या सहप्राध्यापिकेचा वारंवार अश्लील चाळे करून विनयभंग करणाऱ्या घोडबंदर रोड येथील एका महाविद्यालयातील विलास शिंदे या प्राचार्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, त्याला महाविद्यालयाने निलंबित केले असून त्याच्यावर लवकरच अटकेची कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आनंदनगर भागातील ‘होरायझन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ या वरिष्ठ महाविद्यालयातील ३५ वर्षीय प्राध्यापिकेशी शिंदे हा वारंवार गैरवर्तन करत होता. या प्राध्यापिकेला तो महाविद्यालयातील दालनात पाचारण करून आक्षेपार्ह मेसेज पाठवत होता. तसेच कामाच्या बहाण्याने मुंबई विद्यापीठ तसेच इतर ठिकाणी सोबत नेऊन त्यांच्याशी गैरवर्तन करत होता. अपशब्द वापरून त्यांच्या वैयक्तिक जी-मेलमधून डेटा वाचून त्यातील काही डेटा नष्ट करून या प्राध्यापिकेचे वैयक्तिक संदेश आणि फोटोची मॅनेजमेंटला त्याने माहिती दिली. जुलै २०१६ ते १२ मे २०१७ या कालावधीत त्याने त्यांच्याशी हे गैरप्रकार केल्याचे त्यांनी २ आॅगस्ट रोजी केलेल्या आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, महाविद्यालयाने त्याच्यावर कारवाई केली असून तो बाहेरगावी आहे. त्याची चौकशी करून त्याला अटक केली जाणार असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एम. ढोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.