शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित सहाय्यक आयुक्त सुनिल मोरेंचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 00:47 IST

प्रभाग समिती कार्यालयातील फाईल चोरी प्रकरणी निलंबित असलेले ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे मोरे यांना कधीही अटक केली जाऊ शकते, अशी माहिती डायघर पोलिसांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देकोणत्याही क्षणी अटकेची शक्यताडायघर पोलिसांकडून शोध सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बदलीची आॅर्डर निघताच दिव्यातील अनधिकृत बांधकामांची आणि कोविड साहित्य खरेदीची फाईल चोरल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेचे निलंबित सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे मोरे यांना कधीही अटक केली जाऊ शकते, अशी माहिती डायघर पोलिसांनी शुक्रवारी दिली.पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व प्रभाग समित्यांमधील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश १७ आॅगस्ट रोजी काढले होते. त्यानुसार मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांची दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली झाली. तर दिवा प्रभाग समितीचे सुनील मोरे यांची निवडणूक विभागात बदली करण्यात आली. त्यानंतर दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयातून संगणक आणि फाईल्स चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले. दिव्यातील बेकायदा बांधकामांच्या आणि कोविड साहित्य खरेदीच्या फाईल्स चोरी केल्याप्रकरणी मोरे यांच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी त्यांच्यावर पालिका आयुक्तांनी निलंबनाचीही कारवाई केली. मात्र, अटकेची कारवाई टाळण्यासाठी मोरे यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर गुरु वारी सुनावणी झाली असता न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळला.पालिका आणि पोलीस तपासात मोरे यांनी बेकायदा बांधकाम तसेच कोविड साहित्य खरेदीच्या सुमारे सात फाईल्स चोरल्याचे सुकृत दर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर पालिका आयुक्तांनी त्यांना निलंबित करून रोज महापालिकेत हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, १० आॅक्टोबरपासून ते ‘नॉट रिचेबल’ अर्थात गायब झाले आहेत. त्यामुळे बेपत्ता कथित आरोपी मोरेचा डायघर पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtmcठाणे महापालिका