शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'बीएसयुपी'तील बेकायदा भाडेकरूंच्या 'आश्रयदात्या' पालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करा, मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:32 IST

ठाण्याच्या धर्मवीर नगर येथील बीएसयुपी योजनेतील घरांचा हा भोंगळ कारभार मनसेने चव्हाट्यावर आणताच खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने अनधिकृतरित्या राहणाऱ्या रहिवाशांच्या नावे नोटीसा काढल्या आहेत.

ठाणे - बीएसयुपी योजनेतील गोरगरिबांच्या घरांमध्ये अनधिकृतरित्या बिऱ्हाड थाटणाऱ्या बोगस सदनिकाधारकांचा मनसेने पर्दाफाश केला होता. ठाण्याच्या धर्मवीर नगर येथील बीएसयुपी योजनेतील घरांचा हा भोंगळ कारभार मनसेने चव्हाट्यावर आणताच खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने अनधिकृतरित्या राहणाऱ्या रहिवाशांच्या नावे नोटीसा काढल्या आहेत. मात्र केवळ नोटीसा काढून न थांबता पालिका प्रशासनाने या बेकायदा भाडेकरूंचे 'आश्रयदाते' असणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे, या सदनिकांमधील बोगस भाडेकरूंकडून वसुली करणारी आर्थिक साखळी कोण, याचीही चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन केली. 

धर्मवीर नगर येथील तुळशीधाम परिसरातील बीएसयुपी योजनेतील घरे आणि वादाची मालिका थांबतच नसून येथील आनंदकृपा सोसायटी इमारत क्रमांक २३ मध्ये ६०३, ८०२, ८०४, ८०५ व ८०७ या सदनिकांचा काही रहिवाशांनी अनधिकृतरित्या ताबा घेतला आहे. याबाबतची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे आली होती. सोसायटीच्या रहिवाशांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही संबंधित विभागाने बोटचेपी धोरण स्वीकारल्याने मनसे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली होती. अखेर मनसेच्या पाठपुराव्याला यश आले. या प्रकरणी ठाणे पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी बेकायदा पद्धतीने राहणाऱ्या रहिवाशांना नोटीस धाडल्या.

सात दिवसात सदनिका मोकळी करून द्यावी. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. यासोबतच सामान जप्त केले जाईल, असेही या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. केवळ नोटिसा काढून आणि बोगस भाडेकरूंना हुसकावून लावणे, अशी थातुरमातुर कारवाई केल्यास मूळ 'वसुलीकिंग' मोकाट राहतील. पालिका प्रशासनाने त्यांचाही शोध घेणे आवश्यक असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांना घरी बसवावे, अशी मागणी मनसेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आज आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या भेटीदरम्यान केली.      आठ वर्षांचा हिशोब द्या... 

बीएसयुपीच्या या इमारतीमधील घरांचे टाळे तोडून आठ वर्षांपासून रहिवाशी बेकायदा पद्धतीने याठिकाणी वास्तव्याला आहेत. या आठ वर्षांच्या भाड्याच्या रकमेवर कोणी डल्ला मारला, असा सवाल मनसेचे संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आजतागायत या इमारतीची निबंधक सहकारी संस्थेकडे नोंदणी न केल्याने इमारतीची डागडुजीही रखडली आहे. भविष्यात इमारत कोसळून जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :thaneठाणे