शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा अंधारे यांनी आपली वकिलीची नोंद दाखवावी, विभक्त पती वाघमारे यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 11:31 IST

Sushma Andhare :

ठाणे : सुषमा अंधारे यांनी आपल्या वकिलीची पदवी किंवा त्याची नोंदणी दाखवावी. उगाच महाराष्ट्राची फसवणूक करू नये, असे आव्हान सुषमा यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी रविवारी ठाण्यात केले तसेच त्या प्राध्यापक किंवा त्यांच्याकडे डाॅक्टरेटही नसल्याचा दावा त्यांनी केला. वाघमारे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षप्रवेश केला. त्यावेळी वाघमारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या  सुषमा अंधारे यांचे पती ॲड. वैजनाथ वाघमारे हे स्वत: वकील असून मातंग समाज आणि महाराष्ट्राच्या हितासाठी तसेच सर्वसामान्य कष्टकरी, महिलांसाठी आशादायी चित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असल्यामुळे आपण  शिवसेनेच्या  शिंदे गटात प्रवेश केल्याचे वाघमारे  म्हणाले.  ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमातील सभागृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

    ठाणे जिल्ह्यातील वाडा, भिवंडी, शहापूर तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड आणि मुंबई येथील अंधेरी अशा विविध विभागांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नागरिकांचा यामध्ये समावेश होता.     त्यात शहापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष शिंदे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका रजनी शिंदे तसेच भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष इरफान शेख तसेच अंधेरी येथील युवासेनेच्या सुयोग माने यांनी कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला.     पुण्याचे शहरप्रमुख प्रकाश नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारण